ट्विटरच्या ४० कोटी यूजर्सचा डेटा चोरीला

Last Updated: December 27, 2022, 2:10 PM

 Twitter
 Twitter

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  ट्विटरवरील तब्बल ४० कोटी यूजर्सचा वैयक्तिक डेटा एका हॅकरने हॅक केला असून, तो विक्रीसाठी ठेवला आहे. नमुन्यादाखल या हॅकरने गुगलचे प्रमुख सुंदर पिचई आणि बॉलिवुड अभिनेता सलमान यांचा डेटा जाहीर केला आहे.

सायबर सुरक्षा क्षेत्रातील संशोधक अॅलन गॅल यांनी लिंक्डइन साईटवर याबाबत पोस्ट केली आहे. या हॅकरकडे महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन क्रमांक आणि ई-मेल आयडीदेखील आहेत, असे गॅल यांनी म्हटले आहे. हा संपूर्ण डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हॅकरने काही लोकांचे यूजरनेम फॉलोअर्स आणि अकाउंट तयार केल्याची तारीखही उदाहरणादाखल दिली आहे.