ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले… परफेक्ट फिगर

ट्विंकल-खन्नाचा-लंडनच्या-स्विमिंग-पुलावरील-हॉट-व्हिडीओ,-चाहते-म्हणाले…-परफेक्ट-फिगर

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले… परफेक्ट फिगर

Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले… परफेक्ट फिगर

Twinkle Khanna Instagram Video: सध्या लंडनमध्ये फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्स करणाऱ्या ट्विंकलने तिचा एक हॉट व्हिडीओ शेअर केला आहे. 

By: एबीपी माझा ब्युरो | Updated at : 11 Dec 2022 10:38 PM (IST)

Edited By: अभिजीत जाधव

Twinkle Khanna Instagram Viral Video Hot video of Twinkle Khanna in London swimmimg pool fans said Perfect figure Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले... परफेक्ट फिगर

Twinkle Khanna Instagram Viral Video

लंडन: अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमीच तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही लंडनमधील एका स्विमिंग पुलावरचा असाच एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर (Twinkle Khanna Instagram Viral Videoशेअर केला आहे. यामध्ये ती हॉट लूकमध्ये दिसून येते, तसेच ट्विंकलची परफेक्ट फिगर यामध्ये दिसते. ट्विंकलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.  

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी, अभिनेत्री आणि लेखिका असलेली ट्विंकल खन्ना सध्या लंडनमध्ये आहे. लंडनमधील प्रेस्टिजियस गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ती फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्सचा अभ्यास करत आहे. म्हणजेच आजकाल ट्विंकल खन्ना कॉलेज डेज् एन्जॉय करताना दिसत आहे. 

ट्विंकल खन्ना तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो तसेच व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने लंडनमधील स्विमिंग पुलावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील ट्विंकलचा हॉट अवतार पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरून हटत नाहीत. 

Twinkle Khanna Instagram Viral Video: ट्विंकलचा ग्लॅमरस लूक 

नेहमी कुटुंबीयांसोबत व्हिडीओ शेअर करणाऱ्या ट्विंकलने आता स्वत:चा व्हिडीओ शेअर केलाय. समुद्राच्या किनारी असलेल्या स्विमिंग पुलाच्या पाण्यात खेळताना ती दिसत आहे. ग्लॅमरस अवतारात ती स्विमिंग पुलाच्या बाजूने चालताना दिसत आहे. अशा कडक थंडीमध्ये ट्विंकलचा हा लूक अगदीच हटका आणि हॉट असा दिसतोय. या व्हिडीओमध्ये ट्विंकलने स्टायलिश हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ट्विंकलची परफेक्ट फिगर दिसून येते. 

News Reels

ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट करत ट्विंकलच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. सुपर गॉर्जियस मॉम अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 

Published at : 11 Dec 2022 10:38 PM (IST) Tags: Instagram viral video london Twinkle Khanna BOLLYWOOD Hot video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *