टेलिव्हिजनच्या लोकप्रिय मामाजींनी बांधली लग्नगाठ; वरातीत पंकज त्रिपाठी यांचा धमाल डान्स

टेलिव्हिजनच्या-लोकप्रिय-मामाजींनी-बांधली-लग्नगाठ;-वरातीत-पंकज-त्रिपाठी-यांचा-धमाल-डान्स

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी; पंकज त्रिपाठी यांचा डान्स व्हायरल

टेलिव्हिजनच्या लोकप्रिय मामाजींनी बांधली लग्नगाठ; वरातीत पंकज त्रिपाठी यांचा धमाल डान्स

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी

Image Credit source: Instagram

उत्तराखंड: टेलिव्हिजनचा लोकप्रिय अभिनेता, सूत्रसंचालक आणि कॉमेडीयन पारितोष त्रिपाठीने नुकतीच लग्नगाठ बांधली. टीव्हीवर तो मामाजी म्हणून लोकप्रिय झाला. सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम आहे. याच वेडिंग सिझनमध्ये पारितोषही लग्नबंधनात अडकला. पिथौरागढ इथल्या मिनाक्षी चांदवर ते प्रेम करायचे. हे दोघं उत्तराखंडमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

सोशल मीडियावर पारितोषच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यात पारितोषने शेरवानी आणि पगडी परिधान केली होती. तर मिनाक्षीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

पारितोषची अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे. या लग्नसोहळ्याला पंकज यांनीसुद्धा हजेरी लावली होती. पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी यांनी एखाद्या लग्नसोहळ्यात मनसोक्त नाचताना पाहिलं गेलंय. उत्तराखंडमधील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या अतरक्षिया रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

गुरुवारी पारितोष आणि मिनाक्षीचा मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर शुक्रवारी दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय रवी किशन, रवी दुबे, केतन सिंह, शान मिश्रा, नाज, गीता कपूर, ऋत्विक धन्जानी, खेतान सिंह आणि गुंजन तिवारी हे सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.

पारितोषने 2018 मध्ये काशी इन सर्च ऑफ गंगा या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर तो बऱ्याच शोजमध्ये आणि चित्रपटांमध्ये झळकला. ‘सुपर डान्सर’ या शोचं सूत्रसंचालन करताना त्याची मामाजीची भूमिका लोकप्रिय झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *