टुनिषा शर्माच्या मृत्यूला वेगळं वळण, बॉयफ्रेंडबाबत धक्कादायक माहिती समोर

टुनिषा-शर्माच्या-मृत्यूला-वेगळं-वळण,-बॉयफ्रेंडबाबत-धक्कादायक-माहिती-समोर

मुंबई, 24 डिसेंबर : अभिनेत्री टुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. टुनिषा शर्माने सीरियलच्या सेटवरच आत्महत्या केली. मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून टुनिषाने आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सहकलाकार असणाऱ्या टुनिषाच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे. या सहकलाकारासोबत टुनिषाचे प्रेमसंबंध होते, यातून नैराश्य येऊन टुनिषाने आत्महत्या केली, अशी तक्रार तिच्या आईने केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सेटवर काय घडलं?

टुनिषा शुटिंगसाठी स्टुडियोमध्ये आली पण ती सेटवर दिसलीच नाही. यानंतर तिचे सहकलाकार तिला बोलावण्यासाठी मेकअप रूममध्ये गेले. टुनिषा दरवाजा उघडत नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला, यानंतर समोरचं दृष्य पाहून सहकलाकारांना धक्का बसला. कारण तुनिषाने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. तुनिषाला नंतर लगेचच उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

…ते कधीच थांबत नाहीत, आत्महत्येच्या काही वेळ आधीच तुनिषाने इन्स्टा पोस्ट केली अन्…

कोण होती टुनिषा शर्मा?

टुनिषा शर्माने अलिबाबा दास्तान ए काबूल या सीरियलमध्ये शेहजादी मरियमची भूमिका निभावली होती. 20 वर्षांच्या तुनिषाने भारत का वीरपूत्र- महाराणा प्रताप या सीरियलमधून पदार्पण केलं होतं. चक्रवर्तीण अशोक सम्राट, गब्बर पुंछवाला, शेर ए पंजाब महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव्ह आणि इश्क सुभान अल्लाह या शो मध्येही अभिनय केला.

टीव्ही सीरियलशिवाय टुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या फितुर आणि बार बार देखो मध्ये तुनिषाने लहान कतरिना कैफ निभावली होती. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग-3 मध्येही टुनिषाने छोटी भूमिका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *