झक्कास! दीपिका पदुकोण आता साकारणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा

मुंबई, 08 डिसेंबर : रोहित शेट्टीचे कॉप युनिव्हर्स वर आधारित चित्रपट दमदार प्रदर्शन करत आहेत. आतापर्यंत ‘सिंघम’, सूर्यवंशी, ‘सिंबा’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ हा चित्रपट विशेष गाजला. त्यानंतर त्याचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. ‘सिंघम अगेन’ बाबत रोहित शेट्टीने स्वतः खुलासा केला आहे. ‘सर्कस’ चित्रपटामधील ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगदरम्यान रोहितने ‘सिंघम अगेन’बाबत भाष्य केलं. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे. पण आता तिसऱ्या भागाबद्दल रोहित शेट्टीने मोठी घोषणा केली आहे.
रोहित शेट्टी आता ‘सिंघम अगेन’ साठी लवकरच अजय देवगणसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर माहिती दिली की अजय त्याचा पुढचा दिग्दर्शकीय उपक्रम ‘भोला’ पूर्ण केल्यानंतर सिंघम अगेनचे शूटिंग सुरू करणार आहे. पण त्यात विशेष गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या महिला लीडची पुष्टी देखील केली आहे आणि सांगितले की दीपिका पदुकोण सिंघम 3 ची मुख्य अभिनेत्री असेल.
हेही वाचा – Shiv and Veena : ‘सात महिने झाले ब्रेकअप होऊन तरीही…’ बिग बॉसमध्ये अखेर शिवने वीणाविषयी व्यक्त केल्या भावना
रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सर्कसच्या ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगसाठी एकत्र आले. त्यावेळी रोहित म्हणाला, “लोकांना कुठून ना कुठून तरी माहिती ही मिळणारच. त्यापेक्षी मीच या चित्रपटातील अभिनेत्रीबाबत सांगतो. प्रत्येकवेळी लोक मला विचारतात की लेडी सिंघम कधी येणार? तर ‘सिंघम ३’मध्ये लेडी सिंघमची भूमिकी दीपिका पदुकोण साकारणार आहे.”
रोहित म्हणाला, “लोकांना कुठून ना कुठूनतरी कळेल, बरं, मी तुम्हाला सांगतो… आम्ही जो पुढचा चित्रपट बनवत आहोत, सर्वांना माहित आहे की तो कॉप युनिव्हर्सचा सिंघम 3 आहे… प्रत्येक वेळी लोक मला विचारतात की कधी होईल? लेडी सिंघम या?… तर आज मी तुम्हाला सांगतो, सिंघम 3 मध्ये लेडी सिंघम येणार आहे आणि ती लेडी सिंघम दीपिका पदुकोण असेल.”
पुढे रोहित म्हणाला, ”दीपिका माझी लेडी कॉप आहे. 2023 मध्ये आम्ही या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करू.” तर यावेळी रणवीर यावेळी म्हणाला, ”माझ्याशिवाय ‘सिंघम 3’ बनूच शकत नाही”. म्हणजेच पुन्हा रणवीर या चित्रपटात दिसणार असल्याचंही समोर आलं. आता दीपिकाला पोलिसांच्या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.