ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे मुंजवडी ता. फलटण या गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,उपसरपंच यांचा सन्मान

पुणे

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री सदाशिव रणदिवे

मुंजवडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचा गुणगौरव पत्र व सन्मानचिन्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला त्याच बरोबर गावातील खोलेश्वर पॅनलचे गटनेते कमलाकर ठणके गुरुजी व भैरवनाथ पॅनल चे गटनेते जनार्दन ठणके पाटील मुंजवडी गावचे ग्रामसेवक डंगाणे अण्णा मुंजवडी गावचे माजी सरपंच अश्विनी दिलीप ठणके महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परशुराम निखळे यांचाही ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री शिवाजी रणदिवे साहेब यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित दादा पवार विचार मंच फलटण तालुका अध्यक्ष इरफान भैया शेख गावचे उद्योजक मधुकर रणदिवे साहेब पत्रकार सचिन ठणके त्याच बरोबर गावातील तरुण कार्यकर्ते यांना covid-19 योद्धा समाज रक्षक सन्मानपत्र त्यांचाही गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांनी आपल्या संस्थेच्या कामाविषयी ग्रामस्थांना माहिती दिली त्यावेळी ग्रामसेवक अण्णा आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला शेवटी संयोजक व आयोजक यांनी आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *