ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दौंड मध्ये उत्साहात साजरी

पुणे

 

पुणे जिल्हा सदाशिव रणदिवे

दर वर्षी प्रमाणे ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने बहुजनांचे राजे वंदनिय शिवछत्रपतींची जयंती साजरी करत आहोत या वर्षीही शिवछत्रपतींची जयंती सिटी प्राईड शालिमार चौक दौंड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री भगवान जगताप माजी सरपंच खोरवडी तालुका दौंड यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस हार व पुष्प वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जयंतीनिमित्त बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेचे आयोजन तसेच संगणक प्रशिक्षण मोफत देण्याचे सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने त्यांचे आचार विचार आत्मसात करावे असे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे सर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी ज्ञानदेव शिर्के, रणवरे साहेब अमरनाथ साळवे काका, कालिदास जगदाळे, अमन पठाण नागेश साळुंखे, दक्ष गारडे , ओमकार जगताप, सुशील गायकवाड, विश्वजीत बनसोडे, अमरीन बागवान, चेतन कराळे ,रेखा खराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया लोंढे मॅडम यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *