'जोडा अगदी छान शोभतोय हो'; राणा दा अंजलीबाईंनी जोडीनं घेतलं सप्तश्रुंगीचं दर्शन

मुंबई, 11 डिसेंबर : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले. 2 डिसेंबर रोजी दोघांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्याही शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला पहायला मिळाला. त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होते. हे लग्न चांगलंच चर्चेचा विषय ठरला. अशातच अक्षया आणि हार्दीक लग्नानंतर सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरात पोहचले आहेत. त्यांनी नुकतेच मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत.
अक्षया आणि हार्दीकडे त्यांच्या इन्स्टाग्रामवर वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला गेल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. नवदाप्त्यांच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली. दोघांचा खास मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस येत आहे. त्यांची ही पोस्ट क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून पोस्टवर भरभरुन लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
नांदा सौख्यभरे, एक नंबर जोडी, वाह जोडा अगदी छान शोभतोय हो, खूप सुंदर जोडी आहे, खूप छान दिसताय, वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा, जोडा शोभतोय, अशा अनेक प्रकारच्या कमेंट अक्षया हार्दीकच्या पोस्टवर येत आहेत. सगळ्यांचा लाडका राणादा आणि अंजलीबाईं आता आयुष्यभरासाठी एकत्र आल्यामुळे प्रेक्षकही त्यांच्यासाठी खूप आनंदी आहेत. हार्दिक आणि अक्षया इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असतात. दोघेही साखरपुड्यापासून नेहमीच एकमेकांशी निगडित अपडेट शेअर करत आले आहेत. सध्या हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत क्युट पोस्ट शेअर करताना दिसत असतात. दोघांची केमेस्टीही चाहत्यांना चांगलीच भावते.
झी मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीने तर सगळ्यांचीच मने जिंकली. राणा दा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफमध्येही कपल झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.