जिजामाता विद्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन..

राज्य लातूर

लातूर : सोमनाथ काजळे
लातूर शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव(काळे) संचलित जिजामाता विद्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या संकुलाच्या प्राचार्या श्रीमती सलीमाजी सय्यद मॅडम या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर महानगर पालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री. इम्रान सय्यद, लातूर ग्रीन वृक्ष टीमचे डॉ. पवनजी लड्डा व प्रसिद्ध उद्योजक श्री. विशालजी राठी हे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील कलाशिक्षक श्री.बाळासाहेब बावणे सर यांनी ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारली. व त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाबासाहेब सोनवणे यांनी केले.यावेळी प्राचार्या सालिमा सय्यद,मुख्याध्यापिका साविजेता खंदारे मॅडम तसेच संकुलातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रीनवृक्ष टीम लातूर चे सर्व सदस्य इत्यादी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम सामाजिक अंतराचे नियम पाळून घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *