जाणून घ्या कोणत्या अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

जाणून-घ्या-कोणत्या-अभिनेत्रींनी-साकारली-क्रांतीज्योती-सावित्रीबाई-फुले-यांची-भूमिका

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Savitribai Phule Birth Anniversary : सुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिकासुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

Savitribai Phule Birth Anniversary : सुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिकासुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

Savitribai Phule Birth Anniversary Letter to Sushma Deshpande played the role of Kranti Jyoti Savitribai Phule by Patralekha The actress played the role of Krantijyoti Savitribai Phule role Savitribai Phule Birth Anniversary : सुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिकासुषमा देशपांडे ते पत्रलेखा; अभिनेत्रींनी साकारली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका

Savitribai Phule

Savitribai Phule : समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज जयंती आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. स्त्री शिक्षणाबाबत त्यांनी समाजात जागृती केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका लिलया पार पाडली आहे. 

राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande)

‘सत्यशोधक’ या सिनेमात राजश्री देशपांडेने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. स्त्री शिक्षणाबाबत समाजात जागृती करण्यासाठी सावित्रीबाईंनी लढा दिला. त्यांची भूमिका साकारून त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याला सलाम करण्याचा प्रयत्न राजश्रीने केला आहे. 

अश्विनी कासार (Ashwini Kasar)

‘सावित्रीजोती’ या मालिकेत अभिनेत्री अश्विनी कासारने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती. सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्त्व, समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेलं काम, अन्यायाविरुद्धचा लढा अशा अनेक गोष्टी या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या. 

सुषमा देशपांडे (Sushama Deshpande)

‘व्हय मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकात सुषमा देशपांडे यांनी सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती. महाराष्ट्रभर या एकपात्री नाटकाचे प्रयोग झाले. त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांविषयी जनजागृती केली. ‘व्हय मी सावित्रीबाई’ हे एकपात्री नाटक प्रचंड गाजलं. हिंदीतही या नाटकाचे प्रयोग सादर झाले आहेत. 

live reels News Reels

पत्रलेखा (Patralekha)

‘फुले’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी दिलेलं योगदान, महिलांसाठी केलेले कार्य या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. अनंत महादेवन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

पर्ण पेठे (Parna Pethe)

‘सत्यशोधक’ या व्यावसायिक नाटकात पर्ण पेठेने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकरली होती. नाट्यरसिकांनी या नाटकाला चांगला प्रतिसाद दिला होता. 

संबंधित बातम्या

Savitribai Phule Birth Anniversary : महिला शिक्षणाच्या अग्रणी सावित्रीबाई फुले; ज्यांनी मुलींच्या शिक्षणाची दारं उघडली

Published at : 03 Jan 2023 04:00 AM (IST) Tags: savitribai phule Satyashodhak Patralekha rajshri deshpande Sushama Deshpande

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *