जगातील हे बडे नेते PM मोदींचे आहेत चाहते, या 5 नेत्यांशी खास मैत्री

जगातील-हे-बडे-नेते-pm-मोदींचे-आहेत-चाहते,-या-5-नेत्यांशी-खास-मैत्री

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. देशासोबतच जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगातील अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 26 मे रोजी मोदी सरकारला आठवे वर्ष पूर्ण झाले. जागतिक स्तरावर स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याबरोबरच पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर भारताचे स्थान आणखी मजबूत केले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी आपल्या विचारसरणी आणि धोरणांनी जागतिक नेत्यांना प्रभावित केलं आहे. जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी असलेल्या पंतप्रधानांच्या मैत्रीची जगभरात चर्चा होती. केवळ शिंजो आबेच नाही तर आज सर्व देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधानांचे संबंध अतिशय मजबूत आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या भारतासोबतच्या संबंधांवरही दिसून येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन असो किंवा बायडन असो, सर्वांनीच पीएम मोदींचा वरचष्मा मान्य केलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधानांवर खूप प्रभावित होते. एक नजर टाकूया जगातील अशा नेत्यांकडे, ज्यांच्याशी पीएम मोदींची मैत्री खूप घट्ट आहे. तसेच, या नेत्यांवर पीएम मोदींचा खूप प्रभाव आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन –

जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी बायडेन यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली आहे. जून 2022 मध्ये जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या G7 शिखर परिषदेतही दोघांची भेट झाली होती. या भेटीतील विशेष बाब म्हणजे पीएम मोदींना पाहताच बायडेन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे आले. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली. बायडेन यांची ही कृती पंतप्रधानांची जागतिक प्रतिमा प्रकट करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (फोटो ट्विटर/@PMOIndia)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (फोटो ट्विटर/@PMOIndia)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी मैत्री फार पूर्वीपासून आहे. वेळोवेळी दूरध्वनी चर्चेशिवाय दोन्ही नेत्यांची अनेकदा भेट झाली आहे. शुक्रवारीच उझबेकिस्तानमधील समरकंद या ऐतिहासिक शहरात आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेरम्यान पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांची भेट झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी पुतीन यांना अधिकृत चर्चेच्या वेळी सांगितले की, ही युद्धाची वेळ नाही आणि पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत भारताची चिंता मान्य केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही पंतप्रधानांसोबत वाढदिवसाचा उल्लेख केला.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन –

या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताला भेट दिली आणि त्यावेळी त्यांचे खास मित्र पंतप्रधान मोदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या अप्रतिम स्वागतामुळे मला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चनसारखे वाटले, असे जॉन्सनने सांगितले.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फक्त जो बायडेनच नाही तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील पंतप्रधान मोदींचे ‘बेस्ट फ्रेंड’ राहिले आहेत. त्यावेळी अमेरिकेत आयोजित “हाऊडी, मोदी!” कार्यक्रम असो किंवा ट्रम्प यांच्या पहिल्या भारत भेटीदरम्यानचा ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम. दोन्ही नेत्यांमधील मैत्रीमुळे भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर गेले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. इमॅन्युएल पुन्हा फ्रान्सचे अध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधानांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या सभेत मोदींनी मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना ‘दोस्त’ म्हटले.

PM Modi Birthday Special

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *