छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अमोल कोल्हे स्पष्टच बोलले, VIDEO

पुणे, 03 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे.आता या वादावर राष्ट्रवादीचे आमदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असल्याचे पुरावे स्पष्ट नसून स्वराज्य रक्षक ही बिरुदावली व्यापक आहे’ अशी भूमिका मांडली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला खासदार अमोल कोल्हेंनी साथ दिली आहे.
स्वराज्य रक्षक मालिक करत असताना मला जे जाणवलं त्यावरून बोलणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतरावर बंदी आणली होती. छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून धर्मवीर म्हटलं जात असल्याचं काही जण सांगत आहे. पण, समकालिन इतिहासामध्ये संभाजीराजे यांना कैद केल्यानंतर स्वराज्याचा खजिना कुठे आहे? औरंगजेबाची कोण कोण माणसं तुमच्यासोबत सामील आहे? हे दोन्ही प्रश्न विचारले गेले होते, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. फक्त धर्मासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी संभाजीराजेंनी नकार दिला, याबद्दल कुठेही पुरावे मिळत नाही, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला.
‘सभासदांची बखर आणि मल्हारराव चिटणीस यांची बखर येते. चिटणीस यांच्या बखरीमध्ये संभाजीराजेंना जीवे मारण्याचा कट रचला होता, यासाठी मल्हारराव चिटणीस यांचा पंजोबा बाळाजी चिटणीस आणि आजोबा आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. त्यानंतर चिटणीस यांच्या बखरीमध्ये अनेक नाटककार आणि कादंबरीकारांनी याचा संदर्भ घेतला. त्यामुळे ही कवी कल्पना समोर आली, असा खुलासाही अमोल कोल्हे यांनी केली.
‘संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिक करण्यात आली पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं ही संकल्प समोर आली होती. संभाजी महाराजांचा शेवटचा काळ होता, एवढ्यापूरतेच धर्मवीर म्हणून मर्यादीत ठेवले गेले. पण स्वराजरक्षक ही बिरुदावली ही जास्त व्यापक ठरते, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.