गँगरेप

चंदीगड; वृत्तसंस्था : पंजाबातील जालंधरमध्ये कारमधून जात असलेल्या चार तरुणींनी एका तरुणावर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा तरुण पोलिसात फिर्याद दाखल करणार होता. पण, त्याला रोखण्यात आले. समाजमाध्यमांतून ही घटना समोर आली. आता पोलिसांनी आपल्या पातळीवर तपास सुरू केला आहे.

रस्त्याने पायी जात असलेल्या या युवकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलींनी थांबवले. नंतर त्याच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला आणि त्याला गाडीत ओढले. जबरदस्तीने दारू पाजली. त्या मुलीही नशेत होत्या. बहुदा त्यांनी ड्रग घेतलेले होते. सर्व मुलींनी त्याच्यावर एकाचवेळी आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी मुली 20 ते 30 वयोगटातील आहेत.

पीडित तरुण हा कारखान्यात मजूर आहे. तो विवाहित असून त्याला मुलेही आहेत. घटनेनंतर आधी त्याने हे सारे त्याच्या पत्नीला सांगितले. तो पोलिसांत फिर्याद दाखल करणार होता. पण पत्नीच्या सांगण्यावरून त्याने तसे केले नाही. कायद्याने पुरुषावर स्त्रीकडून बलात्कार होत नाही. तसा गुन्हाही एखाद्या महिलेवर दाखल करता येत नाही, असेही त्याला जवळच्या एकाकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा :

  • महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावरुन काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध
  • शाळा सुरू करण्यासाठी महापुरूषांनी भीक मागितली; चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान
  • FIFA WC Spain : फुटबॉल विश्वचषकानंतर स्पेनच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी