चीनमध्ये कोविडचा हाहाःकार! शांघायच्या शवागारात एका दिवसात तब्बल 10,000 मृतदेह

बीजिंग, 30 डिसेंबर : कोरोना संसर्ग आता चीनमध्ये दहशत निर्माण करत आहे. येथे एकीकडे रुग्णालयांमध्ये पाय ठेवायला जागा नाही, तर दुसरीकडे शवगृहे मृतदेहांनी भरलेली आहेत. कोरोना विषाणूमुळे परिस्थिती अशी आहे की एका दिवसात दहा हजारांहून अधिक मृतदेह शांघायच्या शवागारात पोहोचले. चीनमधून आलेल्या बातम्यांनुसार, येथे साथीच्या आजाराने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील एका रुग्णालयाच्या शवागाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतेच शांघायमधील एका हॉस्पिटलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टेटमेंट जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “या दुःखद युद्धात संपूर्ण ग्रेटर शांघाय कोसळेल.” शहरातील 2.5 कोटी लोकांपैकी निम्म्या लोकांना विषाणूची लागण होईल असा अंदाजही रुग्णालयाने वर्तवला आहे. रुग्णालयाने कर्मचार्यांना विषाणूशी अवघड युद्ध लढण्याचा इशारा दिला आहे.
वाचा – आयडियल हाय ब्लड प्रेशर किती असावे? कधी असते चिंताजनक
इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट
गेल्या काही दिवसांपासून शांघायमधील आपत्कालीन कॉलची संख्या 120 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, 28 डिसेंबर रोजी शांघायमध्ये 120 वर 48,534 कॉल करण्यात आले आणि रुग्णवाहिकेने 7,400 फेऱ्या केल्या. चीनमधील मेनलँड द पेपरने 30 डिसेंबर रोजी बातमी प्रकाशित केली. त्यात त्यांनी लिहिले, 29 डिसेंबर रोजी शांघाय जिओ टोंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनशी संलग्न रुइजिन हॉस्पिटलचे उपसंचालक चेन एर्झेन म्हणाले, “नवीन संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याने आपत्कालीन वॉर्डमधील रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. इमर्जन्सी कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे.
80 टक्के रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण वृद्ध
चेन एर्जेन म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून आपत्कालीन वॉर्डमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 1,500 वर पोहोचली आहे. त्यांनी खुलासा केला की या वॉर्डातील 80% संक्रमित लोकांपैकी 40% ते 50% वृद्ध रुग्ण आहेत. ते म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यात हायपोक्सिमिया, छातीत जडपणा आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांचा देखील समावेश आहे. दरम्यान, भारतात अद्याप कोणताही धोका नसला तरी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्थाही तयारी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.