चीनच्या कोरोनाचा देवस्थानांनी घेतला धसका, राज्यातील ठिकठिकाणच्या मंदिरात कोणते नियम पाळावे लागणार?

चीनच्या-कोरोनाचा-देवस्थानांनी-घेतला-धसका,-राज्यातील-ठिकठिकाणच्या-मंदिरात-कोणते-नियम-पाळावे-लागणार?

चीन मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सरकारकडून काही नियमावली येण्याच्या अगोदर मंदिर प्रशासन स्वतःहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.

चीनच्या कोरोनाचा देवस्थानांनी घेतला धसका, राज्यातील ठिकठिकाणच्या मंदिरात कोणते नियम पाळावे लागणार?

Image Credit source: Google

नाशिक : चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जगभरात खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये याकरिता मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक आंतर राखणे अशा नियमांचे पालन करण्याचा निर्णय ठिकठिकाणी होऊ लागला आहे. नुकताच नवी दिल्लीत संसद परिसरात मास्क सक्ती करण्यात आली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मागील काळात जसे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढील काळात करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृतीबाबत सूचनाही केल्या आहेत. हीच परिस्थिती ओळखून महाराष्ट्रातील काही मंदिर प्रशासनाने खबरदरीचा उपाय म्हणून नो मास्क नो एन्ट्री, सामाजिक अंतर, तापमान तपासणी करणे याबाबत निर्णय घेतले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठिकठिकाणचे मंदिर प्रशासन पुढाकार घेत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आहे.

राज्यातील पंढरपूर येथील मंदिर प्रशासनाने नो मास्क नो एन्ट्री केली आहे, सामाजिक आंतर ठेऊन दर्शन रांगेत उभे राहा असे आवाहन केले जात आहे.

शिर्डी येथील देवस्थान, सप्तशृंगी देवस्थान यांच्या वतिनेही मास्क अनिवार्य, सामाजिक आंतर, तापमान तपासणीबाबत आवाहन करण्यात आले आहे.

देवस्थानच्या ठिकाणी मोठी गर्दी असते. विविध ठिकाणाहून भाविक येत असतात, त्यात प्रवास झालेला असतो, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता असते.

दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी बघता, वेळोवेळी त्याबाबत सरकारकडून सूचना दिल्या जात होत्या.

त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून कुठेलीही सूचना किंवा नियमावली जाहीर केलेली नसतांना ठिकठिकाणच्या मंदिर प्रशासनांनी मास्क अनिवार्य केला आहे, त्यामध्ये पंढरपूर, शिर्डी, वणी येथील ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *