चाळीसगाव मध्ये विज वितरण कंपनी च्या कर्मचारी यांची दादागिरी ?

जळगाव

कजगाव ता भडगाव -प्रतिनिधी संजय महाजन

घरात लोक असताना त्यांना कुठलीही सूचना न देता विज कट केले जात आहेत, विजेचे बिल ग्राहकाने भरलेच पाहिजे तर वितरण कंपनी वीज देऊ शकते पण घरी लोक असताना त्यांना कल्पना दिल्यावर माणूस लागलीच काही तरी व्यवस्था करून विज बील भरू शकतो मात्र तसे होत नाही याला शुद्ध दादागिरी म्हणावी का असा प्रश्न आता सर्व जण विचारात आहेत.
चाळीसगाव शहराला किती वीज पुरवठा होतो त्यात किती वीज वापरली जाते, कंपन्यांना किती वीज बिल आहे शिवाय मोठ्या वीज ग्राहकांकडे मोठ्या थकबाकी आहेत त्या भरल्या आहेत का ? त्यातील किती लोकांचे विज कनेक्शन कट केले ? किती वसुली करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे.
नाही तर फक्त गरीब लोकांचीच वीज कट होते का अशी चर्चा गावात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *