चांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ

चांगली-बातमी!-हजार-रुपयांचा-एलपीजी-सिलिंडर-500-रुपयांना,-'या'-तारखेपासून-मिळणार-लाभ

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Updated: Dec 20, 2022, 09:09 AM IST

LPG Gas Cylinder: सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी. बीपीएल (BPL) आणि उज्ज्वला योजनेतंर्गत (Ujjwala Yojana) येणाऱ्या नागरिकांना 500 रुपयात गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) मिळणार आहे. 1 एप्रिलपासून नव्या दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वर्षी उज्ज्वला योजनेतंर्गत (Ujjwala Yojana) 500 रुपये दराने 12 सिलेंडर कुटुंबाला मिळतील. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांनी एका जाहीर सभेत बोलताना ही घोषणा केली. राज्याच्या आगामी अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा महागाईचा भार कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील किट वाटपाची योजना आणण्याचंही अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर पुरवण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ (PMUY) सुरु केली.

उज्ज्वला 2.0 अंतर्गत कनेक्शन घेण्यासाठी पात्रता निकष
उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यानुसार अर्जदाराचं वय किमान 18 इतकं असावं. केवळ महिला अर्जदारांना नोंदणी करता येईल. अर्जदाराच्या कुटुंबातील इतक कोणत्याही व्यक्तीच्या नावावर LPG कनेक्शन नसावं. कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), सर्वाधिक मागासवर्गीय (MBC),अंत्योदय अन्न योजना (AAY) या अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना अर्ज करता येणार

आवश्यक कागदपत्रे
उज्ज्वला कनेक्शनसाठी ई-केवायसी (eKYC) अनिवार्य आहे. (आसाम आणि मेघालयसाठी अनिवार्य नाही). राज्यातर्फे दिल्या जाणाऱ्या रेशन कार्डच्या आधारावर अर्ज करता येणार आहे. कुटुंब रचना सिद्ध करणारी राज्य सरकारची इतर कागपत्रही अनिवार्य आहेत. अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि त्याच पत्त्यावर कनेक्शन आवश्यक असल्यास त्याची माहिीत देणं बंधनकारक आहे. 

उज्ज्वला योजनेचे फायदे
उज्ज्वला योजनेतंर्गत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 1600 रुपये तर 5 किलोच्या सिलेंडरसाठी 1150 रुपयांचं अर्थसहाय्य सरकारकडून दिलं जातं. याव्यतिरिक्त, तेल विपणन कंपन्या (OMCs) द्वारे PMUY लाभार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. कर्जामध्ये LPG स्टोव्हची किंमत 1 बर्नर स्टोव्हसाठी 565 रुपये तर 2 बर्नर स्टोव्हसाठी 990 रुपये आणि कनेक्शनच्या वेळी मिळालेल्या पहिल्या LPG सिलेंडरची रिफिल किंमतीचा समावेश केला जातो. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्जदार आपल्या आसपासच्या कोणत्याही वितरकाकडे अर्ज करु शकतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *