चहते पाठलाग करत असल्याचं कळताच Rashmika Mandana ने गाडी थांबवली, त्यानंतर…

चहते-पाठलाग-करत-असल्याचं-कळताच-rashmika-mandana-ने-गाडी-थांबवली,-त्यानंतर…

चहते पाठलाग करत असल्याचं कळताच Rashmika Mandana ने गाडी थांबवली, त्यानंतर...

चाहत्यांना पाहून रश्मिकाने का थांबवली गाडी? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Rashmika Mandana : ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अभिनेत्री आता फक्त साऊथसिनेसृष्टी पर्यंत मर्यादीत राहिली नसून बॉलिवूडमध्ये देखील रश्मिकाने पदार्पण केलं आहे. रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही, तर फोटो आणि व्हिडीओमुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते.

आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दुचाकी चालकांना तंबी देताना दिसत आहे. अभिनेत्री नुकताच ‘वारिसू’ सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चसाठी चेन्नई येथे गेली होती. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी पार पडला.

कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेलच्या दिशेने जात असताना, काही चाहते दुचाकीवरून अभिनेत्रीचा पाठगाल करत होते. तेव्हा अभिनेत्रीने गाडी थांबवली आणि त्यांना हेल्मेटचा वापर करण्याचं आवाहन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचं म्हणणं ऐकलं आणि निघून गेले.

I Still Wounder , How one can hate a Human being Like Our @iamRashmika pic.twitter.com/i0kaeVB3Af

— Roвιɴ Roвe (@PeaceBrw) December 25, 2022

सध्या रश्मिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा आहे. रश्मिकाच्या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

रश्मिकाच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, ‘पुष्पा’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जूनसोबत झळकणार आहे. एवढंच नाही, तर अभिनेत्री ‘गुडबाय’ चित्रपटानंतर ‘मिशन मजनू’ चित्रपटात दिसणार आहे

‘मिशन मजनू’ चित्रपटात रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ चित्रपटाची कथा 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *