चंद्रकांत पाटलांवर हल्ला करणारे या संघटनेचे कार्यकर्ते, मोठी Update समोर

पिंपरी-चिंचवड, 10 डिसेंबर : भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कालच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला करणारे समता सैनिक दल संघटनेचे कार्यकर्ते आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. समता सैनिक दल संघटनेच्या मनोज गरबडे आणि विजय ओहाळ या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.
वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, भाजपचा हल्लेखोरांना इशारा#ChandrakantPatil #BJP pic.twitter.com/0b15Yq3pky
— News18Lokmat (@News18lokmat) December 10, 2022
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हल्लेखोरांना थेट आव्हान दिलं आहे. मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कुणालाही घाबरत नाही. हिंमत असेल तर समोर या. महाराष्ट्रात ही झुंडशाही चालली आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा
भाजपचा इशारा
दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. ‘शाई फेकणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर कसं द्यायचं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा सन्मान करणारे लोक आहोत. विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवरावं. जर आवरलं नाही आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या घरात घुसले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. घडलेला प्रकार संतापजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.
…तर दिलगिरी व्यक्त करायला तयार, वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचा यूटर्न
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.