चंद्रकांत पाटलांच्या विरोधात पुण्यात तक्रार, सर्वपक्षीयांनी पुणे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत काय म्हंटलय ?

चंद्रकांत-पाटलांच्या-विरोधात-पुण्यात-तक्रार,-सर्वपक्षीयांनी-पुणे-पोलिसांकडे-दिलेल्या-तक्रारीत-काय-म्हंटलय-?

पैठण येथील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्याचे म्हंटले होते.

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात पुण्यात तक्रार, सर्वपक्षीयांनी पुणे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत काय म्हंटलय ?

Image Credit source: TV9 Network

प्रदीप कापसे, नाशिक : पुण्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पैठण येथील कार्यक्रमात त्यांनी महापुरुषांनी शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहता भीक मागून शाळा सुरू केल्या असं म्हंटलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यभर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. चंद्रकात पाटील यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांना पुण्यातील सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर या संघटनेने निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं विधान केल्याने त्यात महापुरुषांचा अपमान झाल्याचे म्हंटले आहे. जनभावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पुण्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पैठण येथील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्याचे म्हंटले होते.

यावेळी महापुरुषांचा संदर्भ देत असतांना आत्ताचे लोक सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहतात, कंपन्यांच्या सीएसआर फंडावर अवलंबून राहतात असं पाटील यांनी म्हंटले होते.

यावरून चंद्रकात पाटील यांच्या विरोधात सर्व ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे, आंदोलने केली जात आहे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर टीकाही होत आहे.

पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पुणे पोलिसांना निवेदन देत चंद्रकांत पाटील यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *