घरात व्हिडिओ गेम खेळत असताना अंगावर पडली वीज, आश्चर्यकारकरित्या बचावला तरुण

viral: पावसाळ्यात (Rainy Season) विजांचा कडकडाट (Crack of Lightning) होणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. वीज पडतानाचं दृश्य तुम्ही प्रत्यक्ष अथवा सोशल मीडियावरील (Social Media) व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडताना पाहिली आहे का?
अंगावर वीज पडल्याने प्रसंगी लोकांचा मृत्युदेखील होतो. पण इंग्लंडमधल्या एका व्यक्तीसोबत वीज पडण्यासंबंधी एक विचित्र घटना घडली. पावसाळ्यात मोकळ्या जागेवर असलेल्या लोकांवर सहसा वीज पडते. परंतु, आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, ती व्यक्ती त्याच्या घरात आरामात बसून व्हिडिओगेम (Video Game) खेळत होती. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज पडली.
मेट्रो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, 33 वर्षांचा एडन रोवन हा समलैंगिक (Gay) असून, तो त्याचा पती अॅरॉन सोबत इंग्लंडमधील (England) ऑक्सफर्डशायरमध्ये राहतो. गेल्या सोमवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास एडन आपल्या घरात प्ले स्टेशनवर व्हिडिओगेम खेळत होता. त्यावेळी अचानक त्याला विजेचा जोरदार कडकडाट ऐकू आला आणि त्यानंतर लगेचच त्याला शरीरात विचित्र जळजळ जाणवली.
घरात आली वीज
एडन अचानक जमिनीवर कोसळला आणि काही मिनिटांतच तो भानावर आला. हाताला अचानक जळजळ (Inflammation) होत असल्याचं त्यानं पतीला सांगितलं. हातावर फोड आल्याचं पाहून दोघंही आश्चर्यचकित झाले. एडनची अवस्था पाहून अॅरॉन त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये त्याला काही तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं.
त्यानंतर त्याला पेनकिलर देऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या अंगावर वीज पडली आणि शरीरातून विजेचा प्रवाह गेल्याने जळजळ जाणवल्याचे समजताच एडन बेशुद्ध पडला. गंमत म्हणजे, एडन जी गेम खेळत होता त्याचं नाव स्ट्रे (Stray) होतं. या गेममध्ये लोक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होताच एका भटक्या मांजराला सुरक्षितस्थळी किंवा तिच्या घरी पोहोचवतात.
हातावर पडला व्रण; टळला मोठा अपघात
जेव्हा अॅरॉन माझ्याजवळ आला आणि जळण्याचा वास कोठून येतोय, असं विचारू लागला तेव्हा माझ्या शरीरात जळजळ होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मी एक ओलं कापड मागितलं पण अंगावर फोड आणि व्रण येतच होते, असं एडननं सांगितलं. त्यानंतर अॅरॉननं त्याच्या आई-वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या मदतीनं तो एडनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
घरात वीज कोठून आली, असा प्रश्न अजूनही एडनला सतावतो आहे. वीज पाण्याच्या संपर्कात येत खिडकीतून घरात शिरली, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. आता एडनची प्रकृती चांगली असली तरी त्याच्या शरीरावर व्रण पडले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.