घराच्या तळघरातून 26 महिलांची सुटका, दक्षिण मुंबईतील खळबळजनक घटना

घराच्या-तळघरातून-26-महिलांची-सुटका,-दक्षिण-मुंबईतील-खळबळजनक-घटना

मुंबई, 22 डिसेंबर : दक्षिण मुंबईतील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दक्षिण मुंबईतील एका घराच्या खास बांधलेल्या तळघरात ठेवण्यात आलेल्या 26 महिलांची मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणारी टोळी चालवली जात होती. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. याबाबतचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने (SSB) मंगळवारी लेमिंग्टन रोड परिसरातील एका इमारतीवर सापळा रचत छापा टाकला.

हे ही वाचा : Shraddha Case: अखेर श्रद्धाच्या मृतदेहाच्या हाडांमधून सत्य उघड, आता आफताबचा फास आवळणार

छाप्यादरम्यान, रॅकेट चालवण्यात सहभागी असलेल्या तीन महिलांसह चार जणांना पकडण्यात आले, परंतु त्यांचे दहा साथीदार घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासाठी पोलीसांनी विशेष पथके तयार करत पळून गेलेल्यांचा तपास करत आहेत.

ते म्हणाले की, परिसराची कसून तपासणी केल्यानंतर पोलिसांना एक खास तळघर सापडले या ठिकाणी 26 महिलांना ठेवण्यात आले होते. सुटका केल्यानंतर, विविध राज्यांतील महिलांनी पोलिसांना सांगितले की त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली.

हे ही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांड: कुटुंबीयांना भेटणार का? आफताबचं उत्तर ऐकून अधिकारीही झाले चकित

एसएसबीकडून अटक केलेल्या पुरुष आणि सुटका केलेल्या महिलांना पुढील तपासासाठी डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील मुख्य आरोप कोण याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच पळून गेलेल्या आरोपींचाही शोध सुरू असल्याचो पोलिसांनी सांगितलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *