घरबसल्या-पाहा

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ टेलिव्हिजन
  • New Year Celebration Shows: नव्या वर्षाचं स्वागत करा मनोरंजनानं; घरबसल्या पाहा ‘हे’ न्यू ईअर स्पेशल शो

New Year Celebration Shows: नव्या वर्षाचं स्वागत करा मनोरंजनानं; घरबसल्या पाहा ‘हे’ न्यू ईअर स्पेशल शो

New Year Celebration Shows: जर तुम्हाला 2022 या वर्षाचा शेवट आणि 2023 ची सुरुवात घरबसल्या टीव्हीवरील कार्यक्रम बघत करायची असेल, तर तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता-

New Year Celebration Shows know when and where to watch New Year Celebration Shows: नव्या वर्षाचं स्वागत करा मनोरंजनानं; घरबसल्या पाहा 'हे' न्यू ईअर स्पेशल शो

New Year Celebration

New Year Celebration Shows: आज  (31 डिसेंबर)  2022 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2022 वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तुम्हाला जर 2022 या वर्षाचा शेवट आणि 2023 ची सुरुवात घरबसल्या टीव्हीवरील कार्यक्रम बघत करायची असेल, तर जाणून घ्या प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या न्यू ईअर स्पेशल कार्यक्रमांबाबत…

बिग बॉसमध्ये येणार खास पाहुणे
बिग बॉसच्या 16 व्या सिझनच्या न्यू ईअर स्पेशल एपिसोडमध्ये काही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. या कार्यक्रमाच्या न्यू ईअर स्पेशल  एपिसोडमध्ये अभिनेते धर्मेंद्र, तसेच कृष्णा अभिषेक हे देखील सहभागी होणार आहेत. हा शो कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता तुम्ही पाहू शकता. 

live reels News Reels

 ‘द कपिल शर्मा शो’ 
 ‘द कपिल शर्मा शो’  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या न्यू ईअर स्पेशल एपिसोडमध्ये काही प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडी स्टार सहभागी होणार आहेत.  झाकिर खान (Zakin Khan), अनुभव सिंह बस्सी (Anubhav Singh Bassi), अभिषेक उपमन्यु (Abhishek Upmanyu) आणि कुशा कपिला हे  ‘द कपिल शर्मा शो’ च्या एपिसोडमध्ये उपस्थित राहणार आहेत. 

 ‘इंडियन आइडल 13’ ची सक्सेस पार्टी
1 जानेवारी रात्री 8 वाजता तुम्ही  ‘इंडियन आइडल 13’  हा शो पाहू शकता. या कार्यक्रमामध्ये हिमेश रेशमिया, विशाल हे यांची गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील.

 स्टार प्लसवरील कार्यक्रम 
22 आयटीए पुरस्कार सोहळा  1 जानेवारी 2023 रोजी स्टापर प्लसवर तुम्ही पाहू शकता. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकता.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Urfi Javed: सुजलेला चेहरा, डोळ्या खाली काळा डाग; फोटो शेअर करुन उर्फी जावेद म्हणाली, ‘मला कोणी मारलं नाही, हे…’

Published at : 31 Dec 2022 03:42 PM (IST) Tags: Entertainment Television BOLLYWOOD New Year 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *