गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीसाठी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना भेटले..

कोल्हापूर

कोल्हापूर -सुभाष भोसले
२ मे. रोजी होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत आता रंगत येत असून या निवडणूकीत इच्छूक उमेदवारांची शिष्टमंडळे आपापल्या नेत्यांना भेटून उमेदवारीची मागणी करत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी भाजपा चे भुदरगड , राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना भेटले..
नाथाजी पाटील हे गेली २५ वर्ष भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत, त्यांनी भुदरगड तालुक्याबरोबरच कोल्हापूर जिल्हयात भाजपा वाढीसाठी काम केले आहे. त्यांनी आकुर्डे येथे दूध संस्था, विकास संस्था, स्थापन केल्या असून आकुर्डेचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. बिद्री साखर कारखाना येथे प्रशासक म्हणून तर मार्केट कमीटी कोल्हापूर येथे त्यांनी संचालक म्हणूनही काम पाहीले आहे..
भूदरगड तालुक्यात त्यांनी अनेक दूध संस्था, सहकारी संस्थांची स्थापना केली आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार त्यांनी गावागावात पोहचवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले असून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून श्री नाथाजी पाटील यांना गोकुळची उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात भाजपाचे युवक नेते अलकेश कांदळकर, तालूका संघाचे संचालक प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, जिल्हा चिटणीस डॉ. सुभाष जाधव, विलासराव बेलेकर, भगवान शिंदे, दिलीप केणे, नामदेव चौगले,हिंदुराव झांबरे -पाटील, सरचिटणीस रणजित आडके, राधानगरी सरचिटणीस सुनिल चौगले उपाध्यक्ष सुनिल तेली, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील,सुनिल पाटील, अशोक येलकर, बाजीराव देसाई, सचिन घरपणकर, रमेश रायजादे ,पांडूरंग वायदंडे, जयराम कांबळे, आनंदा रेडेकर, ए.डी. कांबळे, यांचे सह गोकुळ दूध संघाचे ठराव धारक मोठ्या संखेने उपस्थीत होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *