गुवाहाटी झालं, आता सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गुवाहाटी-झालं,-आता-सर्व-आमदारांना-घेऊन-अयोध्येला-जाणार;-मुख्यमंत्री-एकनाथ-शिंदे-यांची-घोषणा

तुमच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. आमचा निर्णय योग्य असल्याचं त्यातून दिसतं. हे जनतेचं सरकार आहे. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला विकास करायचा आहे.

गुवाहाटी झालं, आता सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गुवाहाटी झालं, आता सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Image Credit source: tv9 marathi

ठाणे: सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर आता शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तशी घोषणा केली आहे. मात्र, अयोध्येला कधी जाणार? याबाबतच मुख्यमंत्र्यांनी काहीही स्पष्ट केलं नाही. बहुतेक महापालिका निवडणुकांच्या आधीच शिंदे गट अयोध्या दौऱ्याला जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाण्यात शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. तुम्ही लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात राहत आहात. उत्तर भारतातून आला आहात.

महाराष्ट्र आणि उत्तर भारताची संस्कृती एकमेकात मिसळून गेली आहे. तुम्हीही महाराष्ट्रीयन झाला आहात. तुमच्यामुळे आम्हीही वारंवार अयोध्येला जात आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आता आम्ही अयोध्येला लवकरच जाणार आहोत. रामाचं दर्शन आधीही घेतलं होतं. आता पुन्हा घेणार आहोत. वारंवार घेणार आहोत. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बनणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. आमच्या या निर्णयामुळे तुम्ही सर्व खूश आहात ना? तुम्हीच नाही संपूर्ण देश खूश आहे. आम्ही जिथे जिथे जातो. तिथे लाखो लोक येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लोक दोन दोन चार चार तास थांबत आहेत, असं ते म्हणाले.

तुमच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. आमचा निर्णय योग्य असल्याचं त्यातून दिसतं. हे जनतेचं सरकार आहे. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे जिथे असाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता मी मुख्यमंत्री आहे. तुम्हाला त्रास होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आम्ही गुवाहाटीत असताना पासी समाजाने आम्हाला सर्वात आधी पाठिंबा दिला. मी टीव्हीवरून पाहिलं होतं. उत्तर भारत आणि महाराष्ट्र वेगळा नाही. सर्व एकच आहे. तुम्ही जिथे राहता त्याबद्दल नेहमीच आदर व्यक्त करता, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. तसेच मुंबईत लवकरच पासी भवन उभारण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *