गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार:- ठाणेदार राजवंत आठवले

राज्य

 

देऊळगाव मही/(प्रतिनिधी):- जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेले अंढेरा पोलीस स्टेशन ला नव निर्वाचित ठाणेदार पदी राजवंत आठवले रुजू झाले आहे.त्या आधी कार्यरत श्री ठाकरे हे ठाणेदार म्हणून अंधेरा येथे कार्यरत होते.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक आठवले हे आपल्या कारकिर्दीत अतिशय शिस्तप्रिय व नैतीक मुल्य जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.रुजू झाल्यावर परिसरात गुन्हेगारी ला लगाम घालून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार तसेच ग्रामीण भागात जनतेशी थेट संपर्क साधत पोलीस व जनता यांचे वैचारिक रित्या जवळीक साधणार जेणे करून गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटना कळायला सोपे जाईल असे मत ग्रामस्थांशी बोलतांना ठाणेदार आठवले यांनी व्यक्त केले.
अंढेरा पोलीस स्टेशन पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांचा राष्ट्रवादी नेते तथा मंडपगाव मा.उपसरपंच राजू भाऊ पठाण मित्रमंडळी च्या वतीने छोट्याखाणी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी बंडू माळी, भैय्यासाहेब देशमुख,शेख महेमुद,राजेंद्र देशमुख,शेख रशीद,साजिद पठाण, शिवाजी राजे देशमुख,रमेश घोंगडे उपस्थित होते.
––——————–
*प्रतिक्रिया*

माझ्या कार्यकाळात माझे कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडेल व परिसरात होणाऱ्या  गैर प्रकारावर नक्कीच अंकुश लावेल तसेच गुन्हेगारीला लगाम घालण्यांचे व अंढेरा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत.
राजवंत आठवले (पो.निरीक्षक अंढेरा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *