गीतकार अरविंद जगताप यांच्यासह लेखक-कवी,गिर्यारोहक आपल्या भेटीला.. आंतरजालावर विशेष पर्वणी मराठी अध्यापक संघाचा उपक्रम

सांगली

सांगलीः आशिष यमगर
सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे वतीने लेखक-कवी,गिर्यारोहक “आपल्या भेटीला” या सदरामध्ये इयत्ता 10 वी च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणा-या लेखकांशी झूम अँपच्या माध्यमातून आंतरजालावर संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार दि.26 जुलै 2020 रोजी सकाळी 8:30 वाजता *”गोष्ट जिद्दी अरूनिमाची”* या पाठाच्या लेखिका व पत्रकार *सुप्रिया खोत*व सायंकाळी 5:30 वाजता दिव्यांगावर मात करणारा साहसी *गिर्यारोहक,पॅराग्लायडर अशोक मुन्ने* आपले अनुभवकथन करणार आहेत. यांच्याशी *विठ्ठल मोहिते हे संवाद साधतील.*
सोमवार दि..27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता झी मराठी वाहिनीवरून ‘चला हवा येवूद्या’ मालिकेतील “पत्रास कारण की.”या पुस्तकाचे लेखक व पाठ्यपुस्तकातील *’आप्पाचे पत्र’* याचे पत्रलेखक,गीतकार *अरविंद जगताप* भेटीला येताहेत.
मंगळवार दि.28 जुलै रोजी सायंकाळी 6:00वाजता तू *”झालास मूक समाजाला नायक”* याचे कवी *ज.वि. पवार* आपल्याशी बोलतील.
बुधवार दि.29जुलै रोजी दुपारी 4:30 वाजता *”खोद आणखी थोडेसे”* याच्या कवयित्री *असावरी काकडे* शिक्षकांच्या भेटीस येताहेत.
यापूर्वी या मालेत लेखक महेंद्र कदम ,डाॅ.सुनिल विभुते,कवी वीरा राठोड,डाॅ,निलीमा गुंडी,डाॅ.सुजाता महाजन हेही सहभागी झाले आहेत.
यासाठी मा.शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, साहित्यिक व उपशिक्षणाधिकारी मा.नामदेव माळी,मारूती लिगाडे,माधुरी गुरव यांचे मार्गदर्शन लाभते आहे.
या उपक्रमासाठी अध्यक्ष-विठ्ठल मोहिते,कार्याध्यक्ष बजरंग संकपाळ,संकल्पक वैशाली आडमुठे,नाना पवार,संजय पाटील हे प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाचा लाभ मराठीच्या शिक्षकांनी घ्यावा,असे अवाहन विठ्ठल मोहिते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *