गडचिरोली : भामरागडमधील तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांकडून हत्या, पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केले कृत्य

Last Updated: December 30, 2022, 3:13 PM

file photo
file photo

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांनी हत्या केली. घिसू मट्टामी (वय ५०) असे गावपाटलांचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली.

  • Gambhir vs Rahul : राहुलला सहजासहजी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही : गौतम गंभीर

घरी झोपेत असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी घिसू मट्टामी यास उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याची दोन गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

  • Jalgaon Accident : अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणाचा, सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा अपघातात मृत्यू

मृतदेहावर नक्षल्यांनी ठेवलेल्या चिठ्ठीत घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचे म्हटले आहे. मात्र, मृतक घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता. तर तो नक्षल्यांच्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य असण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. त्यामुळे ही हत्या नक्षल्यांच्या अंतर्गत वादातून झाली असण्याची शक्यता आहे.

  • Vande Bharat express : वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, ८ तासांत पार करणार ५६४ किमीचे अंतर

दीड महिन्यापूर्वी ८ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यातील झुरी गावचा रहिवासी दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी नामक आपल्या सहकाऱ्याची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्याचप्रकारे घिसू मट्टामी याचीही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे.

अधिक वाचा- 

  • पारगाव : कांदा सडल्यामुळे भावात घट; उत्पादक अडचणीत
  • थर्टी फस्टसाठी बिनधास्त या गोव्यात : किनारे फुलले; सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल
  • कोल्हापूर : दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश