गडकरींनी सांगितलं, ते 'असे' कमवतात खूप पैसे…

गडकरींनी-सांगितलं,-ते-'असे'-कमवतात-खूप-पैसे…

गडकरींनी सांगितलं, ते ‘असे’ कमवतात खूप पैसे…

मुंबई तक

मंत्री नितीन गडकरी हे अतिशय मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे आहेत.

गडकरी हे मनात येईल ते बेधडकपणे सांगून मोकळे होणारे राजकीय नेते आहेत.

आता त्यांनीच आपण दरवर्षाला किती आणि कसे पैसे कमावते ते देखील जाहीरपणे सांगून टाकलं आहे.

अजेंडा आज तक या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी आपल्या कमाईच्या खास आयडिया सांगितल्या आहेत.

‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो… केसांपासून अॅम्युनल अॅसिड बनतं. एकाने प्रयोग केला, हा काही माझा रिसर्च नाहीए.’

‘मला हे समजल्यावर मी त्याचा प्लांट उभा केला. आता मी तिरुपतीमधून एक-दोन ट्रक केस विकत घेतो. आणि अॅम्युनल अॅसिड बनवतो’

‘अॅम्युनल अॅसिडचा वापर हा शेतात वापरल्या जाणाऱ्या खतांमध्ये होतो.’

‘आता माझ्या एक एकर शेतांमध्ये तब्बल 80 टन उसाचं पीक झालं आहे.’

‘पहिली गोष्ट मी बिझनेसमन नाही, मी सोशल इंटप्रन्यूअर आहे. मी शेती विषयात काम करतो.’

‘माझा टर्नओव्हर हा 2500 कोटींचा आहे. मी 15 हजार लोकांना जॉब दिला आहे.’

‘घनकचरा व्यवस्थापनमध्येही मी काम करतो. नागपूर महापालिकेने शौचालयाचं पाणी विकलं. त्यातून पालिकेला 300 कोटी रुपये मिळतात.’ अशा अनेक आयडिया गडकरींनी यावेळी सांगितल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *