गंभीर प्रश्नाबाबत सरकार असवेंदनशील अधिवेशनात..; खडसेंचा शिंदे सरकारला टोला

गंभीर-प्रश्नाबाबत-सरकार-असवेंदनशील-अधिवेशनात.;-खडसेंचा-शिंदे-सरकारला-टोला

जळगाव, 31 डिसेंबर :  हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं. हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकोमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेरलं. मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे नेते आमादर एकनाथ खडसे यांनी अधिवेशनावर प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातील एकाही महत्त्वाच्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही, एकमेकांवर आरोप करण्यातच सर्व वेळ गेला असं खडसे यांनी म्हटलं आहे.

खडसे यांनी नेमकं काय म्हटलं? 

अधिवेशनावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातील एकाही महत्त्वाच्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही, एकमेकांवर आरोप करण्यातच सर्व वेळ गेला. गंभीर प्रश्नबाबत सरकार असवेंदनशील आहे. अधिवेशनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण, एकनेही मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही.  अधिवेशनात सर्वच प्रश्न अनुत्तरीत राहिले, असा टोला एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला लगावला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणावरून निशाणा 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणात देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी असल्याचं म्हणत न्यायालयानं हा रिपोर्ट अमान्य केला. तसेच या प्रकरणात पुन्हा तपास करून नव्याने रिपोर्ट सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. यावरून खडसे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांच्या पाठिमागे कोण होते आणि फोन टॅपिंगमागे काय हेतू होता हे समोर आलं पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *