'खूप काही गमावलंय मी… ' खाजगी आयुष्याबद्दल बोलताना रडली अपूर्वा

'खूप-काही-गमावलंय-मी…-'-खाजगी-आयुष्याबद्दल-बोलताना-रडली-अपूर्वा

मुंबई, 17 डिसेंबर :  बिग बॉसच्या घरातील सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिने साकारलेली शेवंता प्रचंड लोकप्रिय झाली. आता बिग बॉसच्या घरातदेखील अपूर्वा कायम चर्चेत राहते. अनेक सदस्यांशी ती पंगा घेते पण सोबतच काही  चांगली मैत्रीण देखील आहे. अपूर्वा नेमळेकरच्या खाजगी आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते. आता बिग बॉसच्या घरात तिने आपल्या आयुष्यातील मोठ्या दुःखाचा उलगडा केला आहे.

अपूर्वा नेमळेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती राखी सावंतला जाब विचारत आहे. पण तिला बोलताबोलताच ती भावुक झाली. राखीने अपूर्वाची नाईट कॅप  घेतली त्यावरून अपूर्वा तिच्यासोबत भांडत आहे. अपूर्वा यावेळी म्हणाली, ”तुला वाटतं  का राखी मला त्या कॅपने इतका फरक पडेल. पण आयुष्यात खूप काही गमावलंय मी. सगळं घे माझ्याकडून. पण मला काही फरक पडणार नाही.”

हेही वाचा – Ritesh Genelia Exclusive: जिनिलीया नाही तर ही होती रितेशचं पाहिलं प्रेम; अभिनेत्याने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा

पुढे ती म्हणते, ”मला जे द्यायचं नव्हतं, जे आयुष्यभर उराशी कवटाळून ठेवायचं होतं ते सुद्धा गमावलंय मी. त्यात या कॅपचं  काय घेऊन बसलीस. माझं मन खूप मोठं आहे राखी. माझं अस्तित्व तर तू घेऊ नाही शकत” एवढं बोलताच अपूर्वाला अश्रू अनावर झाले.

पुढे ती राखीला  म्हणाली, ”राखी खरं  तर मला आनंद वाटतो कि तू घरात आहेस. मी आयुष्यात आतापर्यंत जे बघितलं नाहीये ना ते तुझ्याकडे बघतेय. तुझ्याकडून मी खूप काही शिकतीये. आता इथूनपुढे आपण फक्त २५ दिवस सोबत आहोत. माझी इच्छा आहे कि तू शेवट्पर्यंत घरात राहावीस. कारण तू जे काही माझ्यासोबत वागशील त्यामुळे खरं तर मला खूप शिकायला मिळत आहे. मी तुझ्याकडून ट्रेन होऊन जातीये. माझ्या जवळच्या व्यक्तीने धोका दिल्यावर त्या परिस्थितीत  कसं जगायचं हे तुझ्याकडून शिकायचंय. थँक्यू” अशा भावना अपूर्वाने यावेळी व्यक्त केल्या आहेत.

या व्हिडिओला कॅप्शन देताना अपूर्वाने लिहिलंय कि, ”माणसाच मन मोठ असल की सगळया गोष्टी त्या मनात सामावून घेत तो आयुष्य भर जगत असतो आपल्या अपूर्वाने मनाचा मोठेपणा दाखवत राखी ला का थँक्स म्हंटल आहे बघा …..” या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी कमेंट करत अपूर्वाला धीर दिला आहे. तसंच  तिचं  कौतुक देखील केलं आहे.

.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *