सिद्धार्थ शिरोळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासह सात कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाने दरवर्षी भरीव निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत गुरुवारी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. ते म्हणाले की, पुणे महापालिका खडकी बोर्डाला 2013 पर्यंत महिन्याला दोन कोटी रुपये जकात करापोटी देत होती.

जकात बंद झाली. जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला. त्यात सर्व महापालिकांचा समावेश झाला. मात्र, सात कॅन्टोन्मेंट बोर्डांना यातून वगळले. प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले की, सात कॅन्टोन्मेंट बोर्डांना पायाभूत सुविधा देण्याकरिता महाराष्ट्र सरकारने 22 ऑक्टोबर 2018 ला निर्णय घेतला होता. त्यातील तरतुदींनुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला योग्य तो न्याय दिला.