Home » क्रीडा » IPL : पंतची जागा धोक्यात, धोनीमुळे बाहेर गेलेला खेळाडू कमबॅक करणार!

IPL : पंतची जागा धोक्यात, धोनीमुळे बाहेर गेलेला खेळाडू कमबॅक करणार!

ipl-:-पंतची-जागा-धोक्यात,-धोनीमुळे-बाहेर-गेलेला-खेळाडू-कमबॅक-करणार!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केलेल्या कामगिरीवरच आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची निवड होणार आहे, पण आयपीएलमधल्या भारतीय खेळाडूंची कामगिरी बघून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचं टेन्शन वाढणार हे निश्चित आहे.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केलेल्या कामगिरीवरच आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची निवड होणार आहे, पण आयपीएलमधल्या भारतीय खेळाडूंची कामगिरी बघून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचं टेन्शन वाढणार हे निश्चित आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह हे खेळाडू संघर्ष करत आहेत. याशिवाय टीम इंडियाच्या विकेट कीपरनाही चमक दाखवता आलेली नाही. धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीनंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम इंडियातलं त्याचं स्थान निश्चित केलं, पण आयपीएलच्या या मोसमात पंतला धमाका करता आलेला नाही. पहिल्या 5 मॅचच्या 4 इनिंगमध्ये पंतने 36.67 च्या सरासरीने आणि 135.80 च्या स्ट्राईक रेटने 110 रन केले आहेत. पंतला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. दुसरीकडे आयपीएल कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात आगमन करणारा इशान किशनही (Ishan Kishan) अपयशी ठरत आहे. मुंबईने 15.25 कोटी रुपये घेऊन विकत घेतलेल्या इशान किशनने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, पण त्यानंतर इशानची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 6 मॅचमध्ये 38.20 ची सरासरी आणि 117.17 च्या स्ट्राईक रेटने त्याने 191 रन केले आहेत. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आग्रही असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनलाही (Sanju Samson) यंदा चांगली कामगिरी करता आलेली नाही. संजूने 5 मॅचमध्ये 23.40 ची सरासरी आणि 148.10 च्या स्ट्राईक रेटने 117 रन केले आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. कार्तिक करणार कमबॅक? एकीकडे टीम इंडियाचे विकेट कीपर आयपीएलमध्ये अपयशी ठरत असतानाच आरसीबीकडून (RCB) खेळताना दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) धमाका केला आहे. दिनेश कार्तिक आयपीएलच्या या मोसमातला आरसीबीचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 6 मॅचच्या 6 इनिंगमध्ये कार्तिकने 192 ची सरासरी आणि 208.69 च्या स्ट्राईक रेटने 192 रन केले आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. 6 इनिंगमध्ये कार्तिक 5 वेळा नाबाद राहिला आहे. 2004 साली दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण भारतीय टीममध्ये धोनीचा उदय झाल्यानंतर कार्तिकला फार संधी मिळाल्या नाहीत. आता धोनीच्या निवृत्तीनंतर आणि टीम इंडियाचे इतर विकेट कीपर अपयशी ठरत असल्यामुळे 36 वर्षांचा दिनेश कार्तिक टीम इंडियात कमबॅक करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  Published by:Shreyas

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Ipl 2022, Rishabh pant, T20 world cup, Team india

  Leave a Reply

  Your email address will not be published.