IPL 2022 : 'मी जबाबदारी घेतो', सलग 6 पराभवांनंतर रोहितची इमोशनल प्रतिक्रिया

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने लागोपाठ सहावी मॅच गमावली आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध मुंबईचा (Mumbai Indians) 18 रननी पराभव झाला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इमोशनल प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे वाचा …
- Maharashtra Maza News
- Last Updated :
मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने लागोपाठ सहावी मॅच गमावली आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध मुंबईचा (Mumbai Indians) 18 रननी पराभव झाला आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा अजून एकही विजय झालेला नाही, त्यामुळे शून्य पॉईंट्ससह मुंबई शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. या खराब कामगिरीमुळे मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे. लखनऊविरुद्ध पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इमोशनल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी याची पूर्ण जबाबदारी घेतो, टीमला माझ्याकडून जी अपेक्षा आहे, त्या मला पूर्ण करता येत नाहीयेत,असं रोहित म्हणाला आहे. काय म्हणाला रोहित? ‘मी प्रत्येक मॅचआधी जशी तयारी करतो, तशीच आताही करत आहे, पण यावेळी गोष्टी पाहिजे तशा होत नाहीयेत. टीमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही, याची मी जबाबदारी घेतो. गेल्या कित्येक वर्षांपासून मी स्वत:ला पाठिंबा देत मैदानात जाऊन खेळ एन्जॉय करत आहे. पुढचा विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा काही जगाचा अंत नाही, याआधीही आम्ही पुनरागमन केलं, आता पुन्हा तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू,’ असं वक्तव्य रोहितने केलं. ‘कशामुळे पराभव झाला, हे सांगणं कठीण आहे. एवढ्या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना तुम्हाला मोठ्या पार्टनरशीपची गरज असते, आज आम्ही यात अपयशी ठरलो. यासाठी कोणतं एक कारण नाही, आम्ही प्रत्येक वेळी व्यक्तीपेक्षा टीमला महत्त्व जास्त देतो,’ असं रोहित म्हणाला. पार्ट टाईम बॉलर असलेल्या तिलक वर्माला मुंबईने पहिली ओव्हर दिली, तसंच लेग स्पिनर मुरुगन अश्विनने दुसरी ओव्हर टाकली. टीमचा महत्त्वाचा बॉलर असलेल्या बुमराहला चौथी ओव्हर देण्यात आली, यावरून रोहितच्या रणनितीवर टीका झाली. हाच प्रश्न रोहितला विचारण्यात आला तेव्हा, ‘लखनऊ खालच्या क्रमांकापर्यंत बॅटिंग करते. तुमचा महत्त्वाचा बॉलर शेवटी ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळे बुमराहला आम्ही शेवटच्या ओव्हरसाठी राखून ठेवतो, पण ही रणनिती काम करत नाहीये. तो चांगली बॉलिंग करतोय, पण इतरांनीही खेळ सुधारण्याची गरज आहे,’ असं रोहितने सांगितलं. ‘प्रत्येक खेळ आमच्यासाठी संधी आहे. परिस्थितीनुसार आम्ही प्लेयिंग इलेव्हन निवडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 6 मॅच गमावल्या आहेत, टीमसाठी योग्य संतुलन काय, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, पण हे विरोधी टीम कशी आहे, यावरही अवलंबून आहे. पराभव झाल्यानंतर टीम बदलल्याचं कारण देणं सोपं आहे, पण आम्ही सर्वोत्तम 11 खेळाडू मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. ‘आमच्या टॉप-4 पैकी एकाने जास्त ओव्हर खेळणं गरजेचं आहे, पण हे होताना नाहीये. आम्ही एकही सामना जिंकलेला नाही, पण आम्हाला आमचा आत्मविश्वास तसाच ठेवणं गरजेचं आहे,’ असं रोहित म्हणाला.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma