Home » क्रीडा » तंबू ते फाईव्ह स्टार हॉटेल! CSK च्या सलमान खानचा प्रवास वाचून तुम्हालाही मिळेल

तंबू ते फाईव्ह स्टार हॉटेल! CSK च्या सलमान खानचा प्रवास वाचून तुम्हालाही मिळेल

तंबू-ते-फाईव्ह-स्टार-हॉटेल!-csk-च्या-सलमान-खानचा-प्रवास-वाचून-तुम्हालाही-मिळेल

मुंबईतील क्रॉस मैदानाच्या तंबूत राहणाऱ्या एका खेळाडूला आयपीएलमुळे थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यांचं नशीब एका रात्रीमध्ये बदललं आहे.  यंदाचा आयपीएल सिझनही त्याला अपवाद नाही. मुंबईतील क्रॉस मैदानाच्या तंबूत राहणाऱ्या एका खेळाडूला आयपीएलमुळे थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. ‘टेन्ट ते ट्रायडंट’ असा मोठा प्रवास करणाऱ्या खेळाडूचे नाव आहे, सलमान खान. सलमान (Salman Khan) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) नेट बॉलर आहे. सलमानचे वडील ग्राऊंड्समन आहेत. मुंबईतील क्रॉस मैदानाच्या तंबूमध्ये राहतो. या तंबूचा वापर मॅचच्या दिवसांमध्ये खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमसाठी होता. या तंबूत राहणारा 22 वर्षांचा सलमान आता महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करत आहे. कसा बनला नेट बॉलर? सलमाननं ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना त्याचा आजवरचा प्रवास सांगितला आहे. ‘मला एकेदिवशी चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला या सिझनसाठी नेट बॉलर होण्याची ऑफर दिली. माझं नाव सीएसकेकडून खेळणाऱ्या मुंबईच्याच तुषार देशांपाडेनं सुचवलं असल्याचं मला समजलं. माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. मला इथं बरंच काही शिकायला मिळणार आहे.’ नेट बॉलर्सना आयपीएल खेळाडू म्हणून करारबद्ध करण्यात चेन्नई सुपर किंग्स आघाडीवर आहेत. या सिझनमध्ये चेन्नईकडून खेळणारे तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी हे यापूर्वी टीमचे नेट बॉलर होते. मुंबईकडून 23 वर्षांखालील गटामध्ये खेळलेल्या सलमानलाही या दोघांप्रमाणे सीएसकेकडून खेळायला मिळेल, अशी आशा आहे. ‘तू चांगलं काम कर, तुझं चांगलं होईल, असे माझे वडील नेहमी फोनवर सांगतात. त्यांची माझ्यावर खूप आशा आहे. मी देखील संपूर्ण प्रयत्न करणार आहे,’ असं सलमाननं यावेळी सांगितलं. IPL 2022 : हैदराबाद फॉर्ममध्ये येताच मालकिण खूश, विजयाचे केले जोरदार सेलिब्रेशन! धोनीनं दिल्या टिप्स सलमानला सीएसकेच्या नेट्समध्ये महेंद्रसिंह धोनीकडूनही टिप्स मिळाल्या आहेत. ‘ऑफ स्पिनरची सर्व जण धुलाई करण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे थोडं डोकं लावून बॉलिंग कर असं मला धोनीनं सांगितलं. तो येत्या काळातही माझ्याशी आणखी चर्चा करणार आहे. सीएसकेमध्ये वातावरण चांगले असून इथं सर्व खेळाडूंना समान वागणूक मिळते,’ असं सलमान म्हणाला. सलमानचे वडील इरदीस देखील मुलाच्या प्रगतीवर खूप आनंदी आहेत. मी गेल्या 40 वर्षांमध्ये ग्राऊंड्समन म्हणून अनेकांना स्टार होताना पाहिलं आहे. ‘माझ्या मुलानंही चांगलं क्रिकेट खेळावं आणि स्वत:च्या पायावर उभं राहावं,’ अशी माझी इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Csk, Ipl 2022, Salman khan

  1 thought on “तंबू ते फाईव्ह स्टार हॉटेल! CSK च्या सलमान खानचा प्रवास वाचून तुम्हालाही मिळेल

  Leave a Reply

  Your email address will not be published.