Home » क्रीडा » हैदराबादच्या डगआऊटमध्ये नितीश राणाची दहशत, षटकार ठोकत फोडली फ्रिजची काच

हैदराबादच्या डगआऊटमध्ये नितीश राणाची दहशत, षटकार ठोकत फोडली फ्रिजची काच

हैदराबादच्या-डगआऊटमध्ये-नितीश-राणाची-दहशत,-षटकार-ठोकत-फोडली-फ्रिजची-काच

मुंबई, 15 एप्रिल: नितेश राणाची (Nitish Rana) अर्धशतकी खेळी आणि आंद्रे रसेलचा फिनिशिंग टचच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. नितेश राणा याने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. राणाने हैदराबादच्या डगआऊटमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली. षटकार ठोकत त्याने हैदराबादच्या डगआऊटमधील फ्रिजची काचच फोडली. सध्या त्याचा फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. डावाच्या 13व्या षटकात, नितीश राणाने उमरानच्या पहिल्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने एक सपाट षटकार मारला, जो थेट सनरायझर्स हैदराबादच्या डगआउटमध्ये ठेवलेल्या फ्रीझमधून गेला, ज्यामुळे फ्रीझची काचही फुटली. हे ही वाचा-Sussex काउंटीसाठी भारत-पाकिस्तान क्रिकेटपटू आता एकत्र करणार फलंदाजी

एका बाजूला विकेट पडत असताना नितेश राणाने संयमी फलंदाजी केली. नितेश राणाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. राणाने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राणाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. पण मोक्याच्या क्षणी नितेश राणा बाद झाला.

Nitish Rana broke the fridge 😂 pic.twitter.com/sd7NRxiBWi

— Sohom ᴷᴷᴿ (@AwaaraHoon) April 15, 2022

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 25 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीने बलाढ्य कोलकाता संघाने निर्धारित षटकांत 8 बाद 175 धावांवर रोखले. अशाप्रकारे सनरायझर्स संघाला विजयासाठी 176 धावांचे आव्हान मिळाले आहे.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.