Home » क्रीडा » किती गोड रे! Mumbai Indians ला चीअर करण्यासाठी छोट्या चीअरलीडर्स तयार, VIDEO

किती गोड रे! Mumbai Indians ला चीअर करण्यासाठी छोट्या चीअरलीडर्स तयार, VIDEO

किती-गोड-रे!-mumbai-indians-ला-चीअर-करण्यासाठी-छोट्या-चीअरलीडर्स-तयार,-video

मुंबई, 8 एप्रिल: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत खेळलेले सर्व सामने गमावले आहेत. त्यामुळे संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत खेळाडूच नव्हे तर छोट्या चीअरलीडर्स देखील तयारीला लागले आहेत. त्या छोट्या चीअरलीडर्स व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाऊंटस् वर क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईने केकेआरसोबतच्या सामन्यपूर्वी, एक छानसा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका आणि मुलगी समायरा (Samaira) व टायटल मिल्स (Tymal Mills) आणि मुलगी डेल्फी (Delhpi) संघाला चीअर करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. IPL 2022 : KKR विरूद्धच्या धक्कादायक पराभवानंतर रोहितनं वाढवला टीमचा उत्साह, सांगितला जिंकण्याचा मंत्र विशेष म्हणजे टायटल मिल्स आपल्या नन्ही परी म्हणजेच डेल्फीला संघाची जर्सी परिधान करताना दिसत आहे. या जर्सीमध्ये डेल्फी खुपच क्युट दिसत आहे. मुंबईच्या खराब कामगिरीनंतर रोहितवर आणखी एक नामुश्की

किती गोड रे!

We just cannot get over the cuteness of Sammy & Delphi as they get ready to cheer us tonight #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/EewGMWd2Qg — Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरूवात खराब झाली आहे. मुंबईनं पहिल्या तीन मॅच गमावल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील सध्या फॉर्मात नाही. केकेआरनं मुंबईचं 162 रनचं आव्हान 16 ओव्हरमध्येच पार केलं. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) 15 बॉलमध्ये नाबाद 56 रनच्या वादळी खेळीमुळे केकेआरनं ही मॅच 24 बॉल राखून जिंकली. केकेआरला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रनची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले. सॅम्सच्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 सिक्स आणि 2 फोर मारल्या, याचसोबत त्याने एक नो बॉलही टाकला. कमिन्सने तब्बल 373.33 च्या स्ट्राईक रेटने रन काढले.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.