Home » क्रीडा » पंजाब किंग्जच्या ताफ्यात इंग्लंडच्या 'या' धडाकेबाज क्रिकेटरची एन्ट्री

पंजाब किंग्जच्या ताफ्यात इंग्लंडच्या 'या' धडाकेबाज क्रिकेटरची एन्ट्री

पंजाब-किंग्जच्या-ताफ्यात-इंग्लंडच्या-'या'-धडाकेबाज-क्रिकेटरची-एन्ट्री

मुंबई, 31 मार्च: आयपीएलचा 15  वा सीझन 26 मार्चपासून सुरु झाला आहे. आत्तापर्यंत सर्व संघानी प्रत्येकी एक एक मॅच खेळली आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रेंचायझीने आयपीएल 2022 (IPL 2022) मधील त्यांचा पहिला सामना रॉयल चॅलेजर्स बेंगलोर (RCB) सोबत खेळला आणि यामध्ये 5 विकेट्स राखून विजय मिळवला. आता दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सोबत रंगणार आहे. तत्पूर्वी, पंजाबच्या टीमसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) मुंबईत दाखल झाला आहे. मात्र, बायो बबल नियमामुळे त्याला दुसरा सामना खेळता येणार नाही. इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी जरी पंजाब किंग्जसोबत जोडला गेला असला, तरी त्याला या सामन्यात सहभाग घेता येणार नाही. बायो बबलच्या नियमांनुसार त्याला पुढचे काही दिवस विलगीकरणात राहावे लागेल आणि नंतर तो टीममध्ये सहभागी होऊ शकतो.

पंजाब किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बेयरस्टो त्यांच्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. चाहत्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कही चाहत्यांनी लिहिले आहे की, ‘आता सुरू होईल खरी दंगल.’ Shane Warne च्या आठवणीत बाउंड्री लाईनवर प्रत्येक विकेटचे लावले स्कोअरकार्ड, SCG मध्ये घेतल्या 64 कसोटी विकेट

बेयरस्टी विरोधी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. तसेच तो कणत्याही क्रिमांकावर फलंदाजी करू शकतो. मागच्या तीन हंगामात त्याने सनरायझर्से हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या 28 सामन्यांमध्ये त्याने 40 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राइक रेटने 1038 धावा केल्या आहेत.

Published by:Dhanshri Otari

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.