Home » क्रीडा » 6 वर्षांनी खेळला एक मॅच, आता टीम इंडियाबाहेर, रोहित-द्रविडचा या खेळाडूवर अन्याय!

6 वर्षांनी खेळला एक मॅच, आता टीम इंडियाबाहेर, रोहित-द्रविडचा या खेळाडूवर अन्याय!

6-वर्षांनी-खेळला-एक-मॅच,-आता-टीम-इंडियाबाहेर,-रोहित-द्रविडचा-या-खेळाडूवर-अन्याय!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. फिट झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांना विश्रांती देण्यात आली आहे.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. फिट झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांना विश्रांती देण्यात आली आहे, पण निवड समिती तसंच कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एका खेळाडूवर अन्याय केला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी या खेळाडूची 6 वर्षांनी टीम इंडियात निवड झाली होती, पण आता अचानक त्याला डच्चू देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोरोनाची लागण झाली, त्यामुळे जयंत यादवला (Jayant Yadav) टीममध्ये स्थान मिळालं. 6 वर्षांनंतर जयंत यादवने मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी कोणतंही कारण न देता जयंत यादवला टीममधून बाहेर करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये जयंत यादवला संधी मिळाली होती, तेव्हा त्याने 10 ओव्हरमध्ये 53 रन दिल्या होत्या, पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. न्यूझीलंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्टमध्ये जयंत यादवला खेळण्याची संधी मिळाली होती. ऑफ स्पिन बॉलिंगसोबतच जयंत यादव खालच्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंगही करतो. जयंतने भारताकडून 5 टेस्ट आणि 2 वनडे खेळल्या आहेत. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 16 विकेट आणि वनडेमध्ये एक विकेट आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी कुलदीप यादवचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. तर आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दीपक हुड्डा आणि रवी बिष्णोई यांनाही संधी देण्यात आली आहे. भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

  Published by:Shreyas

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Rahul dravid, Rohit sharma, Team india

  1 thought on “6 वर्षांनी खेळला एक मॅच, आता टीम इंडियाबाहेर, रोहित-द्रविडचा या खेळाडूवर अन्याय!

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed