Home » क्रीडा » शेतामध्ये सराव, क्रिकेटसाठी 12वी परीक्षा दिली नाही, आता टीम इंडियात एण्ट्री!

शेतामध्ये सराव, क्रिकेटसाठी 12वी परीक्षा दिली नाही, आता टीम इंडियात एण्ट्री!

शेतामध्ये-सराव,-क्रिकेटसाठी-12वी-परीक्षा-दिली-नाही,-आता-टीम-इंडियात-एण्ट्री!

मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) निवड झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. युवा लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. पहिले अंडर-19 वर्ल्ड कप आणि मग आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळताना रवी बिष्णोईने उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर बिष्णोईला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे, पण इथपर्यंत पोहोचण्याचा रवी बिष्णोईचा प्रवास अत्यंत खडतर होता. लहान असताना रवी बिष्णोई शेतामध्ये बॉलिंग करायचा, यानंतर तो जोधपूरच्या क्रिकेट अकादमीमध्ये गेला. राजस्थान रॉयल्सच्या टीमसाठी रवी बिष्णोईची नेट बॉलर म्हणून निवड झाली, त्यावेळी त्याची 12वी परीक्षा सुरू होती. वडील आणि स्वत: रवीलाही परीक्षा द्यायची होती, पण दोन्ही कोचनी रवीला क्रिकेटला प्राथमिकता द्यायला सांगितलं. 2018 साली रवी बिष्णोईची 12 वी बोर्डाची परीक्षा होती, तेव्हाच आयपीएलच्या मोसमाला सुरूवात झाली आणि रवीला राजस्थान रॉयल्ससाठी नेट बॉलिंग करण्याची संधी मिळाली. रवीच्या वडिलांनी त्याला फोन केला आणि कॅम्प सोडून 12 वीची परीक्षा देण्यासाठी घरी बोलावलं. रवीदेखील वडिलांचं म्हणणं ऐकून घरी परतण्यासाठी तयार झाला. घरी जाण्याआधी रवी बिष्णोईने त्याच्या दोन कोचचा सल्ला घेतला, त्यावेळी त्यांनी रवीला तिकडेच थांबण्याचा सल्ला दिला. जागतिक दर्जाच्या खेळाडूंसमोर सराव करणं छोटी गोष्ट नाही, असं कोचनी त्याला सांगितलं. यानंतर रवीने वडिलांचं म्हणणं न ऐकून क्रिकेट सराव सुरू ठेवला आणि 12वीची परीक्षा न द्यायचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं. अंडर-16 आणि अंडर-19 टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे रवी दु:खी झाला होता. अंडर-19 साठी झालेल्या दोन ट्रायलमध्ये रवीला नाकारण्यात आलं, पण जेव्हा नेट बॉलर म्हणून त्याने राजस्थान रॉयल्ससाठी बॉलिंग सुरू केली तेव्हा लोकांची नजर त्याच्यावर गेली. रवीला दिग्गजांनी बॉलिंग टिप्स दिल्या आणि अंडर-19 वर्ल्ड कपसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली. रवी बिष्णोईने लिस्ट ए करियरच्या 17 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या, तर टी-20 च्या 42 सामन्यांमध्ये त्याला 49 विकेट मिळाल्या. 23 आयपीएल सामन्यांमध्ये त्याला 24 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या नव्या मोसमासाठी लखनऊने रवी बिष्णोईला विकत घेतलं आहे.

Published by:Shreyas

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Team india

1 thought on “शेतामध्ये सराव, क्रिकेटसाठी 12वी परीक्षा दिली नाही, आता टीम इंडियात एण्ट्री!

Leave a Reply

Your email address will not be published.