'6 महिने टी-20 मधून ब्रेक घेतोय', T20 World Cup खेळणार नाही दिग्गज खेळाडू!

मुंबई, 27 जानेवारी : ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी आयसीसीने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. वर्ल्ड कपला एवढे महिने शिल्लक असतानाही बांगलादेशचा (Bangladesh Cricket) अनुभवी ओपनर तमीम इक्बाल (Tamim Iqbal) खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पुढचे 6 महिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचं तमीम इक्बालने सांगितलं आहे. तमीमने मागच्या टी-20 वर्ल्ड कपमधूनही माघार घेतली होती. या फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या माझ्या सहकऱ्यांवर अन्याय होईल, असं कारण तमीमने दिलं होतं. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जर वर्ल्ड कपआधी आपल्याला विचारलं तर मी या निर्णयाचा पुनर्विचार करेन, असं तमीमने सांगितलं आहे. तमीम मागच्या बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळत नाहीये. वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये लक्ष देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं तमीमने सांगितलं. ‘माझ्या टी-20 क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा सुरू आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मला वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याचा आग्रह केला जातोय. माझा विचार मात्र वेगळा आहे. मी पुढच्या 6 महिन्यांसाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये खेळण्याचा विचार करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया तमीम इक्बालने दिली. ‘माझं पूर्ण लक्ष टेस्ट आणि वनडेवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि 2023 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्याची तयारी मी करत आहे. पुढचे 6 महिने मी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल विचार करणार नाही. खेळाडू टी-20 मध्ये एवढी चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे माझी गरजच पडणार नाही, अशी आशा मला आहे,’ असं वक्तव्य तमीमने केलं. तमीम इक्बालने अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झिम्बाब्वेविरुद्ध 2020 साली खेळली होती. यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. आतापर्यंत 78 टी-20 मॅचमध्ये त्याने 24.08 च्या सरासरीने 1758 रन केले, यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup
z7ry69K2Bn
Y5VxUpBhaC
e7HRuEkTxa
BKMhu5wG7J
gtn6SsQ98p
jqH6xVPSy8
RQxN8mDHbq
rWuZE683wM
WqeFbBJ4aZ
YP3bNrx7vf
LCqb3ZaeVR
cW6C2vkLKT
FrNw98QszK
rLbyHw85Eh
LbeduCm9r7
YPtz6keqMR
xQjba4At5R
UczaXf7Rkn
t8xevW7wPL
xbavWpP9zr
Lw7NyRFUKZ
VAqnGkW2gX
bknRD9cf2z
Ut75sPh2VY
cG6VQEmDhd
cFK25VEDXM
W8k7xatZfS
hx5QMX4Nj8
wS9taPmWAE
KrHZx7qEsM
LH6JQxpMa5
LsWJp7xSdY
Gm68WgcHZx
Rg24Ny5L7U
u8YCN9kX7E
N3F5e8gD6L
yUWB2qRL59
FPM8cxkdsV
CahSZQe3Gz
TfEKSQ4aAD
GzR5m7WSZj
XFUnc58aRf
sqAC7hKN2e
NgPH83wfLK
g259wGAMpc
ySCAMQTa4K
QY7zpvnyN2
ys4tbADS5Z
fD27C5QbFh
F6d5wpt79e
XA5Teqj7t9
a7Lj3UsXFc
KgG7vqJCm5
U8e3Cm7kTy
eY6QK9UtSg
Rebncf5qWJ
wX6dtCxvMs
E7b6gWApG9