Home » क्रीडा » Smriti Mandhana ने उंचावली भारताची मान! ठरली 'आयसीसी वुमेन ऑफ द इयर'

Smriti Mandhana ने उंचावली भारताची मान! ठरली 'आयसीसी वुमेन ऑफ द इयर'

smriti-mandhana-ने-उंचावली-भारताची-मान!-ठरली-'आयसीसी-वुमेन-ऑफ-द-इयर'

नवी दिल्ली, 25 जानेवारी: भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधनने (Smriti Mandhana) 2021ची रिचेल फ्लिंट ट्रॉफी जिंकत आयीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ 2021 (ICC Womens Cricketer of 2021) चा पुरस्कार मिळवला आहे. आयसीसीने (ICC) नुकतेच 2021 (ICC Awards 2021) वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. चार दिवसांपूर्वी आयसीसीने आपले 2021 वर्षातील कसोटी, वनडे व टी20 संघ जाहीर केले. त्यानंतर सोमवारी (24 जानेवारी) वैयक्तिक पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली. 2021 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (ICC Women’s Cricketer Of The Year 2021) म्हणून भारताची सलामीवीर व मर्यादित षटकांच्या संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची निवड करण्यात आली. स्मृती मानधनाने 2021 मध्ये मोठी कामगिरी केली आहे. तिने या वर्षी 2 कसोटीत 61 च्या सरासरीने 244 धावा केल्या आणि डे-नाइट कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीने यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.20 च्या सरासरीने 352 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 85 पेक्षा जास्त होता. यावर्षी तिने 2 अर्धशतके झळकावली. T-20 मध्ये, मानधनाने 9 T-20 डावांमध्ये 31 च्या सरासरीने 255 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. स्मृतीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2377 धावा फटकावल्या आहेत. तर 84 टी-20 सामन्यांच्या 82 डावात तिने 1971 धावा लगावल्या आहेत. यात तिने 14 अर्धशतकं झळकावली आहेत. चार कसोटीत तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. स्मृतीने आपल्या लहानशा कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. 2018 मध्ये तिने पहिल्यांदा आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पुरस्कार मिळवला होता. त्याच वर्षी तिने सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही नावे केला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी स्मृती सांगली येथील रहिवासी आहे. तसे तिला भारताचे भविष्यातील कर्णधार म्हणून देखिल पाहिले जाते.

Published by:Dhanshri Otari

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Icc

Leave a Reply

Your email address will not be published.