IND vs SA : आफ्रिकेत भारताची लाजिरवाणी कामगिरी, टेस्टनंतर वनडे सीरिजही गमावली

हाइलाइट्स
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव, एक मॅच शिल्लक असतानाच दक्षिण आफ्रिकेकडे 2-0 ची विजयी आघाडी, जानेमन मलानने केले सर्वाधिक 91 रन, तर डिकॉकची 78 रनची खेळी, मार्करम आणि रस्सी व्हॅन डर डुसेन प्रत्येकी 37 रनवर नाबाद, टेम्बा बऊमानेही केले 35 रन. भारताकडून बुमराह, चहल आणि ठाकूरला प्रत्येकी 1-1 विकेट
दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, टेम्बा बऊमा 35 रनवर आऊट, युझवेंद्र चहलला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 36 ओव्हरमध्ये 215/3, विजयासाठी 84 बॉलमध्ये 73 रनची गरज
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, जानेमन मलान 91 रनवर आऊट, जसप्रीत बुमराहला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 34. 4 ओव्हरमध्ये 212/2, विजयासाठी 92 बॉलमध्ये 76 रनची गरज
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, क्विंटन डिकॉक 78 रनवर आऊट, शार्दुल ठाकूरने केलं एलबीडब्ल्यू, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 23 ओव्हरमध्ये 142/1, विजयासाठी आणखी 146 रनची गरज
50 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 287/6, शार्दुल ठाकूर आणि आर.अश्विनच्या नाबाद पार्टनरशीपमुळे भारताचा सन्मानजनक स्कोअर. शार्दुल ठाकूर 38 बॉलमध्ये 40 रनवर तर अश्विन 24 बॉलमध्ये 25 रनवर नाबाद. ठाकूर-अश्विनमध्ये 38 बॉलमध्ये 48 रनची पार्टनरशीप. ऋषभ पंतने 71 बॉलमध्ये केले 85 रन, तर कर्णधार केएल राहुल 79 बॉलमध्ये 55 रन करून आऊट. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीला सर्वाधिक 2 विकेट. मगाला, मार्करम, महाराज आणि पेहक्लुक्वायो यांना प्रत्येकी 1-1 विकेट
भारताला सहावा धक्का, व्यंकटेश अय्यर 22 रनवर स्टम्पिंग, भारताचा स्कोअर 43.5 ओव्हरमध्ये 239/6
भारताला पाचवा धक्का, श्रेयस अय्यर 11 रनवर आऊट, तबरेज शम्सीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 36.5 ओव्हरमध्ये 207/5
भारताचा चौथा धक्का, ऋषभ पंत 71 बॉलमध्ये 85 रन करून आऊट, तबरेझ शम्सीने घेतली विकेट, भारताचा स्कोअर 32.3 ओव्हरमध्ये 183/4
भारताला तिसरा धक्का, केएल राहुल 79 बॉलमध्ये 55 रन करून आऊट, मगालाला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 31.2 ओव्हरमध्ये 180/3
ऋषभ पंतनंतर केएल राहुलचंही अर्धशतक, भारताचा स्कोअर 30 ओव्हरमध्ये 171/2
पार्ल, 21 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे (India vs South Africa 2nd ODI) पार्लमध्ये होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाने कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय फास्ट बॉलरना पहिल्या सामन्यात यश आलं नसल्यामुळे मोहम्मद सिराज किंवा प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. भारतीय टीम शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियासाठी दुसरी वनडे करो या मरो अशीच आहे. या सामन्यातही पराभव झाला तर टेस्ट सीरिजनंतर वनडे सीरिज गमावण्याची नामुष्की टीमवर ओढवेल. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 रनने पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंग करत आफ्रिकेने 296 रन केले. टेम्बा बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांनी शतकं केली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये 265/8 पर्यंतच मजल मारता आली. शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohli) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांनी अर्धशतकं केली.
b2kHVZuxmL
Jd3DxHWcV9
D6yPUFkA9Q
p2CEW9a3rh
WYbKsdu4Bc
G4DjXzJT8u
ULkB4FaAZd
Hh3MvrwpF2
mrud7F8bPe
gVGszB2QS5