Home » Uncategorized » DRS चा वाद, विराटची स्टम्प माईकवर टीका, आता SuperSport ने दिलं प्रत्युत्तर

DRS चा वाद, विराटची स्टम्प माईकवर टीका, आता SuperSport ने दिलं प्रत्युत्तर

drs-चा-वाद,-विराटची-स्टम्प-माईकवर-टीका,-आता-supersport-ने-दिलं-प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 3rd Test) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने तीन टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने गमावली. केपटाऊनमध्ये झालेल्या या टेस्टमुळे डीआरएसवरून मोठा वाद (DRS Controversy) निर्माण झाला.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  केपटाऊन, 15 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 3rd Test) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने तीन टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने गमावली. केपटाऊनमध्ये झालेल्या या टेस्टमुळे डीआरएसवरून मोठा वाद (DRS Controversy) निर्माण झाला. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारच्या एलबीडब्ल्यूवरून हा वाद सुरू झाला. मैदानातले अंपायर मरेस इरासमस यांनी एल्गारला आऊट दिलं, यानंतर त्याने डीआरएस घेतला, पण डीआरएसमध्ये एल्गार नॉट आऊट असल्याचं समोर आलं. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी स्टम्प माईकवर जाऊन मॅचचं प्रसारण करणाऱ्या सुपरस्पोर्टवर निशाणा साधला. यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर.अश्विन (R Ashwin) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचा समावेश होता. भारतीय टीमने केलेल्या या आरोपांवर आता प्रसारणकर्ता सुपरस्पोर्टने प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय टीमनी केलेल्या वक्तव्यांची आम्ही दखल घेतली. डीआरएसमध्ये बॉल ट्रॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या हॉक-आय तंत्रज्ञानावर आमचं कोणतंही नियंत्रण नाही. हॉक-आय ही आयसीसीने मंजूर केलेली स्वतंत्र यंत्रणा आहे. हे तंत्रज्ञान गेल्या अनेकवर्षांपासून अनेकांनी स्वीकारलं आहे, तसंच डीआरएसचा हा मुलभूत भाग आहे. हॉक-आय तंत्रज्ञानावर आमचं कुठलंही नियंत्रण नाही,’ असं सुपरस्पोर्टने सांगितलं. विराटचं स्पष्टीकरण मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीलाही (Virat Kohli) या वादावर विचारण्यात आलं. ‘मला या विषयावर काहीही अधिक बोलायचे नाही. मैदानात काय झाले हे आम्हाला माहिती आहे. बाहेरच्या लोकांना मैदानात काय सुरू होते, ते माहिती नाही. आम्हाला मैदानात जे योग्य वाटले ते केले. आम्ही तो वाद विसरून पुढे गेलो आहोत. मला यावर आणखी जास्त बोलून नवा वाद नको आहे,’ असं विराट म्हणाला. स्टम्प माईकमधल्या वक्तव्यांमुळे वाद ‘आपल्या टीमकडेही लक्ष द्या, जेव्हा ते बॉल चमकवत होते. फक्त विरोधी टीमकडे लक्ष ठेवू नका. पूर्णवेळ लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असं विराट म्हणाला. तर जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा सुपरस्पोर्ट, असं अश्विन स्टम्प माईकसमोर जाऊन म्हणाला. संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत असल्याचं वक्तव्य केएल राहुलने केलं.

  Published by:Shreyas

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: South africa, Team india, Virat kohli

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *