Home » Uncategorized » ICC Test Ranking: ऑफ स्पिनर Ashwin दुसऱ्या स्थानी तर मयंकने घेतली मोठी झेप

ICC Test Ranking: ऑफ स्पिनर Ashwin दुसऱ्या स्थानी तर मयंकने घेतली मोठी झेप

icc-test-ranking:-ऑफ-स्पिनर-ashwin-दुसऱ्या-स्थानी-तर-मयंकने-घेतली-मोठी-झेप

Team India

टीम इंडिया(Team India) 26 डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 8 डिसेंबर: टीम इंडिया(Team India) 26 डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. मुंबईतील दुस-या कसोटीत न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर मयंक अग्रवाल(mayank agarwal) आणि रविचंद्रन अश्विन (R.Ashwin)यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पहिल्या डावात 150 धावा आणि दुसऱ्या डावात 62 धावा करणाऱ्या मयंक अग्रवालने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत 30 स्थानांच्या सुधारणेसह 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अग्रवाल आता टॉप-10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याच्या एक पाऊल मागे आहे, यापूर्वी त्याने हे स्थान नोव्हेंबर 2019 मध्ये मिळवले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अष्टपैलू कामगिरीमुळे आर अश्विनची आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या मालिकेत अश्विननं भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे स्थान पटकावताना हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला . आर अश्विननं एका स्थानाच्या सुधारणेसह दुसरा क्रमांक पटकावला. रवींद्र जडेजा मात्र दोन स्थान खाली सरकला आहे. बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आला. गोलंदाजांमध्येही आर अश्विन 883 रेटींग पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एजाझ पटेलनेही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो 23 स्थानावर पोहोचला आहे. मुंबईत जन्मलेला पटेल कसोटी डावात सर्व 10 बळी घेणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला. त्याने जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांची बरोबरी केली. या सामन्यात त्याने 14 विकेट घेतल्या. मुंबई कसोटी ही आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा एक भाग होती. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनाही फायदा झाला आहे. पण गॅले कसोटीनंतर ज्याला सर्वाधिक फायदा झाला तो सामनावीर धनंजय डी सिल्वा होता, ज्याने दुसऱ्या डावात नाबाद 155 धावांसह 12 स्थानांनी झेप घेत 21 व्या क्रमांकावर झेप घेतली. फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया आणि रमेश मेंडिस यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे. एम्बुल्डेनिया (सात विकेट्सने) पाच स्थानांनी प्रगती करत 32 व्या स्थानावर आहे तर मेंडिसने 11 विकेट्सवरून 18 स्थानांनी झेप घेत 39व्या स्थानावर पोहोचले आहे. फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. मुंबई कसोटीत रोहित खेळला नाही, तर कोहलीने शून्य आणि ३६ धावा केल्या.

  Published by:Dhanshri Otari

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *