Home » क्रीडा » Tokyo Olympics : सौरभ चौधरीचे मेडल हुकले, फायनलमध्ये खराब कामगिरीचा फटका

Tokyo Olympics : सौरभ चौधरीचे मेडल हुकले, फायनलमध्ये खराब कामगिरीचा फटका

tokyo-olympics-:-सौरभ-चौधरीचे-मेडल-हुकले,-फायनलमध्ये-खराब-कामगिरीचा-फटका

भारताचा तरुण शूटर सौरभ चौधरीला (Saurabh Chaudhary) टोकयो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मेडल पटकावण्यात अपयश आले.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 12:50 PM IST

टोकयो, 24 जुलै : भारताचा तरुण शूटर सौरभ चौधरीला  (Saurabh Chaudhary)  टोकयो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मेडल पटकावण्यात अपयश आले. तो फायनलमध्ये सातव्या नबंरवर राहिला. 19 वर्षांच्या सौरभनं पात्रता फेरीत धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावला. क्रसौरभनं पात्रता फेरीत 6 प्रयत्नामध्ये 586 पॉईंट्स मिळवले. त्याने पात्रता फेरीत 95, 98, 98, 100, 98, 97 पॉईंट्स मिळवले होते.

सौरभला चीनच्या झांग वोबेनलं कडवं आव्हान दिले होते. दोघांमध्ये पात्रता फेरीत जोरदा संघर्ष झाला. अखेर शेवटच्या क्षणी सौरभनं बाजी मारली. पात्रता फेरीतील जोरदार कामगिरीनंतर सौरभकडून पदाकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र फायनलमध्ये त्याला खेळ उंचावण्यात अपयश आले.

अभिषेकचा पराभव

या गटामध्ये भारताचा आणखी एक शूटर अभिषेक वर्मा (Abhishek Verma)  देखील सहभागी झाला होता. त्याला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. अभिषेकनं  94, 96, 98, 97, 60 असे एकूण 575 पॉईंट्स मिळवले. अभिषेकनं या फेरीची सुरूवात चांगली केली होती. तो पाचव्या क्रमांकावर आला होता. मात्र त्यानंतर त्याचा खेळ घसरला. अखेर त्याला 17 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं घडवला इतिहास, सिल्व्हर मेडल जिंकले!

महिला खेळाडूंची निराशा

शूटींगमध्ये भारताची सुरूवात खराब झाली. इलोवेनिल वालारिन आणि अपूर्वी चंदेला ही जोडी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली. इलावेनिल 626.5 पॉईंट्ससह 16 व्या तर चंदेला 621.9 पॉईंट्ससह 36 व्या क्रमांकावर राहिली.  त्यामुळे भारतीय शूटर्सना शनिवारी एकही  मेडल पटकावण्यात अपयश आले.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 24, 2021, 12:50 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *