Home » Uncategorized » IND vs NZ: श्रेयस-जडेजानं पालटलं चित्र, पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व

IND vs NZ: श्रेयस-जडेजानं पालटलं चित्र, पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व

ind-vs-nz:-श्रेयस-जडेजानं-पालटलं-चित्र,-पहिल्या-दिवसावर-टीम-इंडियाचं-वर्चस्व
 • Home
 • »

 • News
 • »

 • sport
 • »

 • IND vs NZ: श्रेयस-जडेजानं पालटलं चित्र, पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी केलेल्या दमदार भागिदारीमुळे टीम इंडियानं वर्चस्व मिळवलं आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 25 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी केलेल्या दमदार भागिदारीमुळे टीम इंडियानं वर्चस्व मिळवलं आहे. श्रेयस आणि जडेजानं पाचव्या विकेटसाठी नाबाद 113 रनची भागिदारी केली.  त्यामुळे टीम इंडियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 4 आऊट 258 रन केले आहेत.  गुरुवारी खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर 75 तर रविंद्र जडेजा 50 रन काढून खेळत होते. मुंबईकर श्रेयस अय्यरनं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातच अर्धशतक झळकावलं. श्रेयसनं 94 बॉलमध्ये 6 चौकारासह त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. लंचनंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट आऊट झाल्यानंतर श्रेयस मैदानात उतरला होता. त्यानं सुरुवातीला कॅप्टन अजिंक्य रहाणेसोबत छोटी भागिदारी केली. रहाणे 35 रन काढून आऊट झाल्यानंतर श्रेयसनं जडेजाच्या मदतीनं इनिंग सावरली. टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 145 अशी होती, तेव्हा ही जोडी एकत्र आली. त्यांनी दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवला. जडेजानं त्याचं अर्धशतक 99 बॉलमध्ये 6 चौकारांसह पूर्ण केलं.

  A solid stand of 113* runs between Shreyas Iyer and Ravindra Jadeja helps India go to stumps at 258/4.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/M54yxXsG5A

  — ICC (@ICC) November 25, 2021

  यापूर्वी सकाळी अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. या टेस्टमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) ही जोडी टीम इंडियाकडून मैदानात उतरली. त्यांना भक्कम सुरूवात करता आली नाही. मयांक अग्रवाल 13 रन काढून आऊट झाला. त्याला कायले जेमिसननं (Kyle Jamieson) आऊट केलं. पहिली टेस्ट सुरू होताच टीम इंडियाला धक्का, श्रीलंकेनं हिसकावला पहिला क्रमांक मयांक आऊट झाल्यानंतर शुभमन गिलची चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबत जोडी जमली. सुरुवातीला शांत खेळणाऱ्या गिलनं जम बसल्यानंतर फटकेबाजी करत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकललं. गिलनं त्याच्या टेस्ट करिअरमधील चौथं अर्धशतक 81 बॉलमध्ये पूर्ण केलं. यामध्ये त्यानं 1 सिक्स आणि 5 फोर लगावले. न्यूझीलंडकडून जेमीसननं 3 तर टीम साऊदीनं 1 विकेट घेतली.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed