Home » क्रीडा » IND vs SL : स्पिनच्या जाळ्यात टीम इंडियाची शिकार, 4 ओव्हरमध्ये बदलली परिस्थिती

IND vs SL : स्पिनच्या जाळ्यात टीम इंडियाची शिकार, 4 ओव्हरमध्ये बदलली परिस्थिती

ind-vs-sl-:-स्पिनच्या-जाळ्यात-टीम-इंडियाची-शिकार,-4-ओव्हरमध्ये-बदलली-परिस्थिती

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात टीम इंडियाला (Team India) अपयश आले.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 08:08 PM IST

कोलंबो, 23 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात टीम इंडियाला अपयश आले. पावसाच्या ब्रेकनंतर श्रीलंकेच्या स्पिनर्सनी जोरदार कमबॅक केले. त्यामुळे टीम इंडियाची पहिली इनिंग 43.1 ओव्हर्समध्ये 225 रनवर संपुष्टात आली. भारतीय बॅट्समनना संपूर्ण 47 ओव्हर्सही खेळण्यात अपयश आले.

या मालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकला. धवननं टॉस जिंकताच तात्काळ बॅटींगचा निर्णय घेतला. कॅप्टन धवन 13 रन काढून आऊट झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 रनची पार्टनरशिप केली.

पृथ्वी शॉ यावेळी दुर्दैवी ठरला. त्याचे अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं. संजू सॅमसनचंही वन-डे पदार्पणात अर्धशतक झळकावण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. तो 46 रन काढून आऊट झाला. पावसामुळे खेळ थांबवा त्यावेळी मनिष पांडे (10) तर सूर्यकुमार यादव 22 रन काढून खेळत होते.

4 ओव्हर्समध्ये बदलली परिस्थिती

पावसाच्या अडथळ्यानंतर हा सामना 47 ओव्हर्सचा करण्यात आला. या ब्रेकचा श्रीलंकेच्या बॉलर्सना फायदा झाला. जयविक्रमानं लगेच मनिष पांडेला आऊट केले. पांडेनं 11 रन काढले. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देखील मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 19 रन काढून आऊट झाला. पांडे आऊट होताच सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम आणि नितीश राणा हे झटपट आऊट झाले. टीम इंडियाची  4 आऊट 179 ते 8 आऊट 195 अशी घसरण फक्त 4.2 ओव्हर्समध्ये झाली.

कोरोनाच्या सावटामध्ये क्रीडा महाकुंभाला सुरूवात, भारतीय पथकाचे दमदार संचलन! पाहा VIDEO

सर्व प्रमुख बॅट्समन आऊट झाल्यानंतर राहुल चहर आणि नवदीप सैनी यांनी थोडावेळ प्रतिकार केल्यानं टीम इंडियाला 225 चा टप्पा गाठता आला. श्रीलंकेकडून अकिला धनंजया (Akila Danajaya) आणि प्रवीण जयविक्रमा (Pravin Jaywickrama) हे दोन स्पिनर यशस्वी ठरले. या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. चामिराला 2, तर दासून शनाका आणि करुणारत्ने यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 23, 2021, 8:05 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *