Home » क्रीडा » IND vs SL : सूर्यकुमार यादव आऊट होण्यापूर्वीच श्रीलंकेचा जल्लोष, पाहा VIDEO

IND vs SL : सूर्यकुमार यादव आऊट होण्यापूर्वीच श्रीलंकेचा जल्लोष, पाहा VIDEO

ind-vs-sl-:-सूर्यकुमार-यादव-आऊट-होण्यापूर्वीच-श्रीलंकेचा-जल्लोष,-पाहा-video

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेसमोर विजयासाठी 47 ओव्हर्समध्ये 227 रनचं आव्हान आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेल्या घाईमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 09:18 PM IST

कोलंबो, 23 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेसमोर विजयासाठी 47 ओव्हर्समध्ये 227 रनचं आव्हान आहे. भारतीय इनिंगच्या दरम्यान आलेल्या पावसामुळे हा सामना 47 ओव्हर्सचा निर्धारित करण्यात आला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेल्या घाईमुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

भारताच्या इनिंगमधील 23 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घटला. जयविक्रमाच्या बॉलवर मैदानातील अंपायरनं तो LBW असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर यादवनं या निर्णयावर थर्ड अंपायकडे कौल मागितला. तिसऱ्या अंपायरचा निर्णय येण्यापूर्वीच  श्रीलंकेच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला.

#INDvSL pic.twitter.com/YGeK8CED0z

— The sports 360 (@Thesports3601) July 23, 2021

श्रीलंकेचा हा जल्लोष सुरू असतानाच  तिसऱ्या अंपायरनं नॉट आऊटचा निर्णय दिला. जयविक्रमाचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर (Suryakumar Yadav DRS Controversy) जात होता. श्रीलंकेचे खेळाडूंना DRS च्या नियमांची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या अंपायरचा निर्णय येण्यापूर्वीच सेलिब्रेशन सुरू केला. त्यानंतर तिसऱ्या अंपायरनं सूर्याला नॉट आऊट देताच लंकेच्या खेळाडूंना धक्का बसला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी दाखवलेल्या या घाईमुळे ते सध्या चांगलेच ट्रोल होत आहेत.

चूक का झाली?

श्रीलंकन खेळाडूंची ही गैरसमजूत तिसऱ्या अंपायरमुळे झाली. नियमानुसार ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपच्या बाहेर बॉल गेला तर तिसरा अंपायर बॉल ट्रॅकींग पाहत नाही. पण तिसऱ्या अंपायरनं यावेळी तरीही बॉल ट्रॅकिंग पाहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदानातील अंपायरचा निर्णय तिसरा अंपायर मान्य करणार अशी आशा त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी जल्लोष सुरू केला.

 ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचं करिअर समाप्त! फ्लॉप कामगिरीनंतर Memes चा पाऊस

श्रीलंकेचा पहिल्या वन-डेमध्ये 7 तर दुसऱ्या वन-डेमध्ये 3 विकेटनं पराभव झाला आहे. आता व्हाईटवॉशची नामुश्की टाळण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 23, 2021, 9:18 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *