Home » क्रीडा » BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माघार, अडचणीत सापडताच दिला राजीनामा

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माघार, अडचणीत सापडताच दिला राजीनामा

bcci-अध्यक्ष-सौरव-गांगुलीची-माघार,-अडचणीत-सापडताच-दिला-राजीनामा

IPL 2022 मधील नव्या टीम जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) अडचणीत आले होता. अखेर गांगुली यांनी यातून मार्ग काढण्यासाठी मोठ्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 28 ऑक्टोबर: पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दोन नव्या टीमची (IPL 2022 New Teams) सोमवारी दुबईमध्ये करण्यात आली होती. यामध्ये . लखनऊच्या (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) या दोन टीम पुढील आयपीएल लिलावात उतरणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे.  लखनऊच्या फ्रँचायझींचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) आहेत. त्यांच्या आरपीएसजी ग्रुपने (RPSG) लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. गोयंका यांच्या ग्रुपला लखनऊची फ्रँचायझी मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) वादात सापडले होते. गोयंका हे इंडियन सुपर लीगमधील एटीके-मोहन बागान टीमचे सहमालक आहेत. गांगुली त्यांच्या टीममध्ये सहभागी होते. गांगुलींचा या टीममधील संचालक मंडळात सहभाग असून संजीव गोयंका याचे संचालक आहेत. नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर सौरव गांगुलीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर, गांगुली यांनी आणखी वाद टाळण्यासाठी एटीके मोहम बागान टीमच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गांगुलीनं ‘क्रिकबझ’शी बोलताना राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी लखनऊ टीमचे मालक संजीव गोयंका यांनीही गांगुली पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं. अहमदाबादची टीम वादात सौरव गांगुली यांनी राजीनामा दिल्यानंतर लखनऊ टीमबाबत सुरू असलेला वाद कमी होणार असला तरी अहमदाबादच्या टीमचा वाद कायम आहे. अहमदाबादची टीम खरेदी करणारा CVC ग्रुप सध्या संशयात आला आहे. CVC कॅपिटलनं बेटींग आणि जुगार कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली उघडकीस आलेल्या बेटींग आणि फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलची यापूर्वीच बदनामी झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सापडल्यानं त्यांच्यांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. IPL Auction मधील सर्वात महागड्या खेळाडूनं सोडली देशाकडून खेळण्याची आशा, म्हणाला… आता त्यापाठोपाठ बेटींग आणि जुगारातील उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या कंपनीला आयपीएल फ्रँचायझी देण्यात आल्यानं बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे.  या प्रकाराला भारतीय कायद्यानुसार बंदी आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  1 thought on “BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माघार, अडचणीत सापडताच दिला राजीनामा

  Leave a Reply

  Your email address will not be published.